Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजूरात स्वच्छतेचा जागर - स्वच्छोत्सव 2023
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्वच्छता जनजागृती प्रभातफेरीने परिसर दुमदुमले नागरिक व विद्यार्थ्यांनी केले सामूहिक प्रतिज्ञेचे वाचन आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा ...
स्वच्छता जनजागृती प्रभातफेरीने परिसर दुमदुमले
नागरिक व विद्यार्थ्यांनी केले सामूहिक प्रतिज्ञेचे वाचन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २९ मार्च २०२३) -
        राजुरा नगरपरिषद तर्फे स्वच्छोत्सव 2023 दिनांक 7 मार्च ते 30 मार्च 2023 या कालावधीत महिलांच्या स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिगत करण्यासाठी राबविण्यात आले. राजुरा नगरपरिषद क्षेत्रात स्वच्छतेच्या संदेश व जनजागृती प्रभातफेरीचे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सुरुवात झाली. शहराच्या मुख्य रस्त्यांनी स्व. नारायणसिंह उईके चौक, नेहरू चौक, आंबेडकर चौक, राम मंदिर व नंतर नगरपरिषद कार्यालयात प्रभातफेरीचा समारोप करण्यात आला व त्यानंतर नगरपरिषद प्रांगणावर कुमारी सुरेखा पटेल प्रकल्प अधिकारी यांनी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले व सर्वांकडून स्वच्छतेच्या प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर शेवटी राष्ट्रगीत घेऊन व सर्वांचे आभार मानून रॅलीची सांगता झाली. (Jagar-of-cleanliness-in-Rajur-Swachhotsav-2023)

        रॅलीत शहरातील महिला बचत गटाच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रॅलीत सहभाग नोंदविला. (Adarsh ​​High School) आदर्श हायस्कूलचे (Adarsh ​​High School) राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी यांनी (National Green Army) सुद्धा रॅलीत उपस्थित राहून सहभाग नोंदविला, त्याचप्रमाणे माझे शहर साफ असो त्यात सर्वांचा हात असो, असा एका चिमुकलीचा आर्त हाक होता ह्या संदेशाकडे रॅलीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमात सखी मंच राजुराचे पदाधिकारी यांनी सुद्धा सहभाग नोंदविला व DAY NULMच्या CRP व दर्पण शहर स्तर संघ राजुरा यांचे परिश्रम लाभले. नगर परिषदेतीळ कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शविली. स्वच्छता जागरच्या यशस्वितेकरिता नपचे प्रशासकीय अधिकारी विजय जांभुळकर, पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी, प्रकल्प अधिकारी सुरेखा पटेल, समूह संघटक प्रांजली सरपटवार, विद्युत अभियंता आदित्य खापणे, करनिरीक्षक उपेंद्र धामणगे, मिळकत व्यवस्थापक अक्षय सूर्यवंशी, लेखापाल अश्विन कुमार भोई, लिपिक संजय जोशी, वीरेंद्र धोटे, राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख बादल बेले व आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (Citizens and students read the collective pledge) (Nagar Parishad Rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top