गडचांदूर (दि. २९ मार्च २०२३) -
बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बुलडाणा या बँकेच्या 471व्या शाखेचे उदघाटन आमदार सुभाष धोटे (mla subhash dhote) यांनी फीत कापून केले. तत्पूर्वी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. (Inauguration of Gadchandur Branch of Buldana Urban Bank)
शाखेच्या उदघाटनप्रसंगी बुलडाणा अर्बन बँकेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर, गडचांदूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे संचालक विजय बावणे, पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, नगर परिषद चे उपाध्यक्ष शरद जोगी, नगरसेवक विक्रम येरणे, माजी सरपंच शिवकुमार राठी, गोपाल मालपाणी, लेखा परिक्षक अभय राजंदेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
बुलडाणा अर्बन बँकेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांनी आपल्या भाषणात सांगितले की याक्षेत्रात राधेश्याम चांडक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बुलडाणा अर्बन केवळ बँकिंग क्षेत्रातच नाहीत तर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे. 1986 साली स्थापन झालेल्या बुलडाणा अर्बन बँकेचा महाराष्ट्र व इतर राज्यात 475 शाखा कार्यान्वित असून यात एकूण 10763 कोटी रुप्याच्या ठेवी असून सभासद संख्या 13 लाख 60 हजार आहे.
यावेळी उदघाटक आमदार सुभाष धोटे यांनी बुलडाणा अर्बन बँकेच्या कार्याची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या. शाखेच्या उदघाटन प्रसंगी गडचांदूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी जसराजजी धूत, राजेंद्र चांडक, संजय चांडक, राजुरा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, हरभजनसिंह भट्टी, चकनलवार, पूनम शर्मा, जेष्ठ पत्रकार प्रा.अशोक डोईफोडे, उद्धव पुरी, गडचांदूर शाखा व्यवस्थापक विष्णू घायाळ, विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, गावातील व्यापारी उपस्थित होते. प्रास्ताविक विभागीय व्यवस्थापक राहुल देशपांडे यांनी, संचालन नासिर खान (चंद्रपूर) यांनी तर आभार विभागीय व्यवस्थापक विनय राजे यांनी केले. (gadchandur)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.