राजुरा (दि. २ मार्च २०२३) -
संत श्री वामनबाबाच्या पावलांनी पुनीत होत असलेल्या हिरापूर नगरीत संत वामन बाबांच्या दर्शनासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांनी भेट दिली. (adv sanjay dhote) (hirapur)
अँड संजय धोटे यांनी पंचमुखी नंडीगड जगन्नाथ बाबा देवस्थान हिरापुर येथील जगन्नाथ बाबाच्या मूर्तीला हार घालून अभिवादन केले. यानंतर त्यांनी संत श्री वामन बाबा याना शाल, दूपटा देवून त्यांचा आशीर्वाद घेतला व देवस्थान परिसराची पाहणी करून येथे होत असलेल्या धार्मिक व सामाजिक कार्यांची स्तुती केली. श्री पंचमुखी नंडिगल देवस्थान चे अध्यक्ष अनंता गोखरे यानी माजी आमदार अँड. संजय धोटे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत स्वागत केले. याप्रसंगी हिरापूर येथील उपसरपंच अरुण काळे, विरूर गाडेगाव येथील उपसरपंच मारोती गोखरे, विशाल पावडे, संजय मुसळे, शशिकांत आडकिने माथा, समशिर शेख, विलास काळे, सोमेश्वर जोगी, वसंता विधाते, तन्वीर शेख, लखन वटोरे, बंटी आगलावे उपस्थित होते. संचालन संस्थेचे कोषाध्यक्ष अमोल पावडे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.