राजुरा (दि. ३ मार्च २०२३) -
राजुरा तालुका तेली समाजाच्या वतीने संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी व विविध बांधकामाचे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज सांस्कृतिक सभागृह राजुरा- गडचांदूर रोड, सास्ती टी पॉइंट जवळ, रामपूर राजुरा येथे करण्यात आलेले आहे. (sant shiromani jagnade maharaj)
दि. 5 मार्च रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार रामदास तडस, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा हे राहणार आहेत. तर उदघाट्क म्हणून बाळू धानोरकर, खासदार, चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा क्षेत्र हे राहतील. भूमिपूजन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉ. रामदास आंबटकर, आमदार, विधानपरिषद, ऍड. अभिजित वंजारी, आमदार, विधानपरिषद, नागपूर, सुधाकर अडबाले, आमदार, विधानपरिषद, चंद्रपूर तर प्रमुख अतिथी म्हणून विजयराव बावणे,संचालक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक, अतुल वांदिले, राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवक महासभा, अजय वैरागडे, विभागीय अध्यक्ष पूर्व विदर्भ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, सूर्यकांत खणके, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. खासदार बाळू धानोरकर यांचे स्थानिक विकास निधी अंतर्गत 25 लक्ष रुपयांचे सभागृह बांधकाम भूमिपूजन, आमदार सुभाष धोटे यांचे स्थानिक विकास निधी अंतर्गत रुपये 15 लक्ष स्वच्छतागृह व संरक्षण भिंत भूमिपूजन या कार्यक्रमासह संताजी शॉपिंग कॉम्प्लेक्स चे भूमिपूजन होणार आहे. सकाळी दहा वाजता संत संताजी जगनाडे महाराज यांची भव्य पालखी शोभयात्रा जुने बस स्थानक मार्गे राजुरा शहरातील मुख्य बाजारपेठेतून कार्यक्रम स्थळापर्यंत निघणार आहे. या सर्व कार्यक्रमाला समाज बांधवानी मोठयासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक तेली समाज युवक मंडळ, विदर्भ तेली समाज महासंघ, श्री संत संताजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, तेली समाज कल्याण मंडळ वेकोली, सास्ती राजुरा यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.