Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना तालुक्यात 10वी च्या परीक्षा शांततेत सुरु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
1738 विद्यार्थी देत आहेत 7 केंद्रावरून परीक्षा आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. 2 मार्च 2023) -         महाराष्ट्...
1738 विद्यार्थी देत आहेत 7 केंद्रावरून परीक्षा
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. 2 मार्च 2023) -
        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी च्या परीक्षा 2 मार्च पासून सुरु झाल्या आहेत,
        कोरपना तालुक्यातील 7 परीक्षा केंद्रावरून एकूण 1738 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सर्वाधिक विद्यार्थी सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर या परीक्षा केंद्रावर  379 आहेत. महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे 337, वसंतराव नाईक विद्यालय कोरपना ला 201, स्व. भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा कोरपना ला 200, जवाहरलाल नेहरू विद्यालय आवारपूर ला 257, आदर्श किसान विद्यालय नारंडा 149, माध्यमिक आश्रम शाळा धानोली 215 असे एकूण 7 परीक्षा केंद्र आहेत. 

        कोरपना तालुक्याचे परीरक्षक कार्यालय महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे असून या कार्यालयचे परीक्षक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सचिनकुमार मालवीय जबाबदारी सांभाळत आहेत, तर उपपरिक्षक म्हणून रवींद्र आत्राम त्यांना सहकार्य करीत आहे. आज पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, गट विकास अधिकारी विजय पेंदाम यांनी कोरपना येथील परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. शांतता व सुव्यवस्था मध्ये पार पडावी यासाठी सर्वच परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे,

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top