आज शुक्रवारी सकाळी तिघांचेही मृतदेह आढळून आले
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि २७ जानेवारी २०२३) -
26 जानेवारी निमित्य शाळेतील प्रजासत्ताक कार्यक्रम आटपून खेळायला निघालेली मुले सायंकाळ पर्यंत घरी न पोहोचल्याने त्यांचा शोध घेतल्यास ते पोहण्याकरीता अल्ट्राटेक सिमेंट वसाहत परिसरात कंपनीने खोदलेल्या तलावा जवळ त्यांचे कपडे आणि चपला मिळाले होते. काल शुरू केलेल्या शोध मोहिम नंतर आज शुक्रवारी सकाळी तिघांचेही मृतदेह आढळून आले आहेत. (Ultratech Cement Company) (Police Station Gadchandur)
तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल गुरूवारी सायंकाळी 6 वाजताचे सुमारास उघडकीस आली होती. अल्ट्राटेक सिमेंट वसाहतीत राहणाऱ्या दर्शन बच्चाशंकर, पारस गोवरदीपे व अर्जून सिंह असे मुलांचे नाव आहे. तिन्ही मुले चौथ्या वर्गात शिकणारी असुन तिघेही अल्ट्राटेक कंपनी वसाहतीत कर्मचाऱ्यांची मुले आहेत.
कंपनीच्या खड्याजवळ त्या मुलांचे कपडे आढळून आल्याने त्यांचा खड्यात बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यापैकी आज शुक्रवारी सकाळी तिघांचेही मृतदेह आढळून आले. मुले अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, आवारपुर येथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलांची आहे. याच कंपनीच्या आवारात कंपनीने सोलर प्रोजेक्ट जवळ मोठे तळे खोदलेले आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून असते. काल प्रजासत्ताक दिवस असल्याने सकाळी ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास बारा वर्षाखालील तीन मुले दर्शन बच्चा शंकर, पारस गोवारदिपे व अर्जून सिंह हे पोहण्याच्या उदेश्याने गेले. पोहताना त्यांना खोल खड्डयांचा अंदाज न आल्याने ते पाण्याने तुडूंब भरलेल्या खड्यसात बुडाले.
मुले घरी लवकर परतले नाहीत त्यामुळे त्यांच्या बद्दल विचारपूस करण्यात आली. शोधाशोध करण्यात आल्याने तिन्ही मुलांचे सायंकाळच्या सुमारास त्या खड्याजवळ कपडे आढळून आल्याने तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. कंपनी व्यवस्थापन व गडचांदूर पोलिसांना माहिती दिली. काल रात्र झाल्यामुळे त्यांचा मुलांचा शोध घेता आला नाही. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करून सकाळी दर्शन बच्चाशंकर, पारस गोवारदीपे, अर्जुन सिंह या तिन मुलांचे मृतदेह आढळून आले. त्यांचे मृतदेह गडचांदूर पोलिसांनी ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरीता गडचांदुर ग्रामीण रूग्णालया पाठविला. या घटनेमुळे आवारपुर अल्ट्राटेक वसाहतीत शोककळा पसरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.