Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सामाजिक उपक्रमातून हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नवी दिशा सेवा सदनातील अनाथ बालके, मनोरुग्ण तसेच वृद्धांना साहित्यांचे वाटप आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी राजुरा -         हिं...
नवी दिशा सेवा सदनातील अनाथ बालके, मनोरुग्ण तसेच वृद्धांना साहित्यांचे वाटप
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
        हिंदुहदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेना शाखा राजुरा तर्फे नकोडा येथील नवी दिशा सेवा सदनातील अनाथ बालके, मनोरुग्ण तसेच वृद्धांना अन्नधान्य, शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक उपक्रमातून जयंती साजरी करण्यात आली.

        तत्पूर्वी राजुरा येथील संत नगाजी महाराज सभागृहात हिंदुहदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक प्रदीप सुर्वे सर यांनी हिंदुहदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले कि, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबां सारख्या ज्वलंत विचारांच्या विर पुरषाची या महाराष्ट्राला गरज आहे. यावेळी पत्रकार दीपक शर्मा, अनंता गोखरे उपस्थित होते. 

        ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे धोरणे आहे. हे धोरण वंदनीय हिंदुहदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठरविले होते त्यांच अनुषंगाने बाळासाहेबांची जयंती साजरी करायची आहे असे शिवसेना तालुका प्रमुख निलेश गंपावार यांनी ठरविले होते, त्याच अनुषंगाने घुग्गुस जवळील नकोडा येथील नवी दिशा सेवा सदनातील अनाथ बालके, मनोरुग्ण तसेच वृद्धांना अन्नधान्य व शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक उपक्रमातून जयंती साजरी करण्यात आली. या उपक्रमाकरिता दानशूर व्यक्तींनी सरळ हाताने मदत दिली. रोटरी क्लब ऑफ राजूराने शालेय विद्यार्थ्यांकरिता कंपास व पेन्सिल भेट म्हणून दिल्या. 

        कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिवसेना तालुका प्रमुख निलेश गंपावार, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल चौधरी, आनंद मस्की, शहर प्रमुख आशिष वाढई, उपशहर प्रमुख समीर शेख, नबी खान पठाण, मोरेश्वर भोंगळे, आकाश यांनी परिश्रम घेतले. यावेळी शेकडो शिवसौनिक प्रामुख्याने उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top