Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दुल्हाशहा बाबा उर्स उत्सवाला सुरूवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तीन दिवसीय महोत्सवाला भक्तांनी मोठी गर्दी..! आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधि कोरपना (दि. ६ मार्च २०२३) -         चंद्रपूर जि...
तीन दिवसीय महोत्सवाला भक्तांनी मोठी गर्दी..!
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधि
कोरपना (दि. ६ मार्च २०२३) -
        चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरपणा येथून जवळ असलेल्या कुसळ येथील पुरातन काळातील हजरत अब्दुल रहमान दुल्हा शाह बाबा रहमतुल्लाह अलैह याच्या मजारावर परशमकुशाई कार्यक्रम पार पडला दि. ४ मार्चला जामा मस्जीद कोरपना येथुन शाही संदल सायं४वा उर्स कमेटीकडुन गावात गस्त घालीत मजार वर पोहचून चादर चढविल्या जाणार आहे पोलीस प्रशासनाकडून यात्रा परिस्थीती व्यवस्था पाहणी पोलीस अधिक्षक रविन्द्र परदेशी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त पोलीस अधिक्षक जनबधुं मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल नायक, ठानेदार संदीप एकाडे यांनी व्यवस्थेची पाहणी करूण व्यवस्था व ट्राफिक व्यवस्थेची पाहणी जागेसंबधात आढावा घेऊन व्यवस्थेसंबधी सुचना दिल्या. यावेळी चोख बंदोबस्त करण्यात आले आहे. (Dulhashah Baba Urs) (korpana)

       विदर्भासह तेलंगाना राज्यातुन भाविक व चाहते मोठया प्रमाणात दर्शनासाठी येतात. अनेक मन्नत व लंगरचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ मार्च रोजी कौमी एकता कार्यक्रम व कव्वालीचा शानदार कार्यक्रम पार पडला. अनेक मनोरजंनाचे व लहान मुलाना आकर्षित खेळणी व मनोरजंन साधन येथे उपलब्ध झाल्याने व होळी सनामूळे लोकाची बरीच चहपहल कुंटूबासह अनेक हिन्दु मुस्लीम सर्वधर्मसमभाव एकतेचे दर्शन येथे दिसून येते. दोन वर्ष कोरोनानतंर उत्सव साजरा होत असल्याने पोलीसानी चोख बंदोबस्त ठेवित असून ट्रस्टचे अध्यक्ष आबीद अली, सचिव बाबाराव सिडाम उर्स कमेटीचे अध्यक्ष शहेबाज अली इसराईल, नईम नदिम, नादिर कादरी, फैजान, पवन मडावी यांचे सह सर्वकार्यकर्ते व्यवस्था सह भाविकाची गैरसोयी होऊ नये यासाठी प्रयत्नरत आहेत. दरवर्षी प्रमाणे ३ दिवस उर्स महोत्सव साजरा केल्या गेला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top