Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महिला दिनानिमित्त माईंड पावर सेमिनार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर मनपाचा उपक्रम आमचा विदर्भ - दीपक शर्मा  चंद्रपूर (दि. ६ मार्च २०२३) -         जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ब...
चंद्रपूर मनपाचा उपक्रम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. ६ मार्च २०२३) -
        जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे बचतगटातील महिलांसाठी सत्कार, मार्गदर्शन व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन यात इंटरनॅशनल मोटीव्हेशनल स्पीकर सोनिया जडाजी यांच्याद्वारे माईंड पावर सेमिनार कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

        दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत ८ मार्च रोजी मनपा राणी हिराई सभागृह येथे दुपारी ३ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सोनिया जडाजी यांच्याद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. सोनिया जडाजी या माईंड ट्रेनर, संमोहन तज्ञ,करीयर मार्गदर्शक, कॉरपोरेट ट्रेनर तसेच इंटरनॅशनल मोटीव्हेशनल स्पीकर आहेत.देशभरात विविध जागी त्यांनी मार्गदर्शक म्हणुन व्याख्यान दिले आहेत.    
      
        आदिशक्तीचे रुप असलेल्या स्त्रीयांमध्ये सर्व विश्व सामावले आहे. अशा स्त्रीत्वाचा गौरव व्हावा यासाठी सदर कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धा,महिलांचा सत्कार,मेळावा, जनजागृती व विविध विषयांवर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top