Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लोकशाहीची पायमल्ली, हुकूमशाही कडे वाटचाल : आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राहुल गांधींची खासदारकी रद्द प्रकरणी प्रतिक्रिया आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी  राजुरा (दि. २४ मार्च २०२३) -         सुरत खटल...
राहुल गांधींची खासदारकी रद्द प्रकरणी प्रतिक्रिया
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी 
राजुरा (दि. २४ मार्च २०२३) -
        सुरत खटल्यातील प्रकरणात न्यायालयाने 30 दिवसाचा अवधी देऊन देखील, आता राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेने मोदी सरकार धास्तावले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव दिसत आहे. याच भीतीतून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याची कारवाई केली आहे .ही लोकशाहीची पायमल्ली असून हुकूमशाहीकडे वाटचाल आहे. अशी प्रतिक्रिया राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांनी दिली. (Rahul Gandi) (Subhash Dhote)

        अदानी प्रकरणावर मोदी सरकार अडचणीत आले आहे. अदाणी प्रकरणात विरोधकांनी सभागृहात बोलू नये यासाठी भाजपने सूडबुद्धीचे राजकारण केले आहे. सीबीआय, इडी सारख्या संस्थांच्या माध्यमातून विरोधकांना वेटीस धरले आहे हे सुदृढ लोकशाहीसाठी मारक आहे. अशीही प्रतिक्रिया आमदार सुभाष धोटे यांनी दिली. (Rahul Gandhi's reaction to the cancellation of MP)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top