Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सिंधी शेतशिवारात विज पडून सात जण जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. २४ मार्च २०२३) -         राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी शेतशिवार...
जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. २४ मार्च २०२३) -
        राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी शेतशिवारात विज पड्न सात जण जखमी झाले आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

        आज दुपारी एक वाजताच्या सुमारास सिंधी येथील मधुकर धानोरकर यांचे शेतात शेतमालक, पत्नी व इतर १५ मजुर काम करित असताना मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. यावेळी शिवारात विज कोसळली व त्यात मधुकर धानोरकर, उषा सुरेश चौधरी हे जखमी झाले आहे. याशिवाय किरण पुरुषोत्तम चौधरी, माधुरी भाष्कर मोरे, मंदाबाई मधुकर धानोरकर, मृनाल शेषराव बोबडे, अर्चना सुनिल चौधरी असे इतर जखमी झाले. या सर्व जखमींना उपचारार्थ ग्रामीण रुग्नालय राजुरा दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत. यापैकी मधुकर उद्‌धव धानोरकर व उषा सुरेश चौधरी हे गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top