Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रेनवॉटर हार्वेस्टिंग झाले नसल्यास बांधकामधारकांची अनामत रक्कम होणार जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शहरातील सर्व बोअरवेल धारकांना व विहीरी असणाऱ्या घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य रेन वॉटर हार्वेस्टींग केल्यास केले जाणार सन्मानीत...
शहरातील सर्व बोअरवेल धारकांना व विहीरी असणाऱ्या घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य
रेन वॉटर हार्वेस्टींग केल्यास केले जाणार सन्मानीत  
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपूर (दि. २३ मार्च २०२३) - 
        चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत नवीन बांधकाम करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था करणे अनिवार्य असून, त्यासाठी इमारत बांधकाम परवानगी देताना छताच्या आकारानुसार व मजलानिहाय अनामत रक्कम आकारण्यात येते. मात्र, शहरातील ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून, रेनवॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था केल्याचे पुरावे सादर केलेले नाही, अशा बांधकामधारकांनी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग न केल्यास त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येणार आहे.

        शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता आहे. रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मालमत्ताधारकांना १००० चौ. फुट पर्यंतच्या इमारती क्षेत्राला ५ हजार , १००१ ते २००० चौ. फुट क्षेत्राला ७ हजार तर २००१ पुढील चौ. फुट क्षेत्राला १० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान तसेच पुढील ३ वर्षांपर्यंत २ टक्के मालमत्ता करत सुट महानगरपालिकेतर्फे देण्यात येते.

        शहरात बांधकाम परवानगी प्राप्त इमारतींपैकी १२४ इमारतधारकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याचे पुरावे सादर करून अनामत रक्कम परत घेतली आहे. उर्वरीत बांधकामधारकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग (Rainwater harvesting) केले नसल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे. महानगरपालिका सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार शहरातील सर्व बोअरवेल धारकांना व विहीरी असणाऱ्या घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य आहे.    

        रेन वॉटर हार्वेस्टींग करण्यासंबंधी सर्व मालमत्ता धारकांना दूरध्वनी, एसएमएस, व्हॉइस मॅसेज तसेच प्रत्यक्ष भेट देऊन सुचित करण्यात येत असुन प्रोत्साहन म्हणुन राष्ट्रवादी नगर येथील हॉटेल जायका फुड अँड ड्रींक्सतर्फे खाद्य पदार्थांवर १० टक्के सुट देणारे कुपन शहरातील रेन वॉटर हार्वेस्टींग करून देणाऱ्या कंत्राटदारांना देण्यात आले असुन नागरीकांनी आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा बसविल्यावर कंत्राटदारांकडुन सदर कुपन घेता येईल. अधिकाधिक नागरीकांनी आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टींग करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. (Municipal Corporation Chandrapur)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top