आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १९ मार्च २०२३) -
शहरातील अनेक शाळां व महाविद्यालय मधील विद्यार्थी सध्या दररोज नव्या आव्हानाला तोंड देत आहेत. बेशिस्त वाहनचालकांच्या वेगावर आळा घालण्याकरिता तसेच प्रशासनाने बहुतांश शाळांसमोर ‘पुढे शाळा आहे’ अशा आशयाचे फलक लावल्यानंतरही वाहनचालक तीव्र गतीने वाहने चालवितात परिणामी आपले शिक्षण घेणारे मुलं-मुली घरी येईपर्यंत पालकांचाही जिव टांगणीला लागलेला असतो. (Mayor Savita Tekam and the delegation gave a statement to Thanedar) (Gadchandur) (Savita Tekam)
शहरातील शहीद बाबुराव पुल्लेसुर शेडमाके चौक, महात्मा गांधी चौक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहनांची खुप वरदळ असते. या चौकातून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी ये-जा करीत असतात. बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात होण्याची शक्यता नेहमी असते याबाबतची तक्रार शहरातील नागरिक नगराध्यक्ष सौ. सविता टेकाम यांचेकडे घेऊन येत होते. नागरिकांची मागणी लक्षात घेता नगराध्यक्ष सौ. सविता टेकाम, बांधकाम सभापती सौ. मीनाक्षी एकरे, महिला बालकल्याण सभापती सौ. जयश्री ताकसांडे, नगरसेविका सौ. कल्पना निमजे यांच्या शिष्टमंडळाने या तिन्ही चौकात वाहतूक पोलीस नेमण्याच्या मागणीचे निवेदन ठाणेदाराने दिली. यावेळी शहरातील अनेक महिलाही उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.