चंद्रपूर (दि. ११ मार्च २०२३) -
सार्वजनिक सभागृह धानोरा येथे अनुसूचीत जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ अंतर्गत सामुहिक कायद्यामध्ये पंचायत प्रतिनिधींची व सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समितीची भुमीका, कार्य व व्यवस्थापन आराखडा तयार करून रोजगार तयार करने या विषयावर एफ.ई.एस. सामाजिक संस्थेच्या वतीने सिंदेवाही तालुक्यातील धानोरा परिसरातील सरपंच, ग्रामसेवक, अध्यक्ष, सचिव, समीती सदस्य व ग्रामसभा सदस्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण पार पडले.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या गावात आपले सरकार, गावातील ग्रामसभा सशक्त करून वनहक्क कायद्याने ग्रामसभेला दिलेले अधिकार आणि त्यातून गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने जंगलाचे संरक्षण, संवर्धन करून गाव विकासाचा जागर घडवून आणण्यासाठी एफ.ई.एसचे जिल्हा समन्वयक शुभम वानवे, जिल्हा प्रशिक्षक सुकेशनी बांगडे यांचे मार्गदर्शनात सिंदेवाही तालुक्यातील धानोरा येथे परिसरातील पाच गावांतील प्रतिनिधींची प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. यावेळी मरेगाव येथील सरपंच पुजा वाकडे, सुनंदा गावळे, स्मितकुमार वलादे, परशुराम सलामे, श्रीरंग वाकडे उपस्थित होते. यावेळी एफ.ई.एसचे नागभिड तालुका प्रशिक्षक गणेश भुते व सिंदेवाही येथील तालुका प्रशिक्षक संजीव मसराम यांनी सामूहिक वनहक्क व व्यवस्थापन समितीच्या कार्याविषयी प्रतिनिधींना सखोल मार्गदर्शन केले.यावेळी या प्रशिक्षण कार्यशाळेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.