Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: क्रीडा महोत्सवाने जागतिक महिला दिन साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर प्रतिनिधी राजुरा (दि. ११ मार्च २०२३) -         ग्रामपंचायत टेंबुरवाही अंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून...
आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर प्रतिनिधी
राजुरा (दि. ११ मार्च २०२३) -
        ग्रामपंचायत टेंबुरवाही अंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गावातील महिलांकरिता सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवात महिलांनी उत्फुर्तपणे भाग घेतला. सदर कार्यक्रमाकरिता उद्घाटक म्हणून पुरवठा निरीक्षक सौ. सविता गंभीरे मॅडम, प्रमुख अतिथी म्हणून विरूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल निर्मल, गावातील प्रथम नागरिक रामकृष्ण मडावी व इतर पाहुणे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत टेंभुर्वाही येथील सरपंच व सदस्य ग्रामसेवक अमोल बदखल, ग्रामपंचायत कर्मचारी गावातील बचत गटाच्या महिलांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top