Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खंनगन शाळेत होळी व जागतिक महिला दिन साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. ११ मार्च २०२३ ) -         निसर्ग मिञ मंच बहुउद्देशिय संस्था राजुरा द्वारा संचलित My khangan scho...
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ११ मार्च २०२३ ) -
        निसर्ग मिञ मंच बहुउद्देशिय संस्था राजुरा द्वारा संचलित My khangan school मध्ये मोठ्या उत्साहात होळी आणि जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

        या कार्यक्रमात विद्यार्थी आणि त्यांच्या आई सोबत विविध खेळ तसेच व्यक्तिमत्व विकास (personality development) च्या दृष्टीने विविध प्रकारचे रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी जेसीसच्या माजी अध्यक्षा सुषमा शुक्ला प्रमुख पाहुणे म्हणून आणि शाळेच्या  संचालिका-मुख्याध्यापिका सौ. नम्रता खंनगन या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचलन सौ. स्वरूपा झंवर यांनी तर आभार प्रदर्शन मोनिका ईपावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षिका श्वेता हजारे, रेखा क्षीरसागर यांचे योगदान लाभले यावेळी पालकही उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top