आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. ५ जानेवारी २०२३) -
क्रीडा स्पर्धेच्या युगात कला गुणांना व्हावं देण्याची गरज असून ग्रामीण भागातील युवकांनी मैदानी खेळावर जोर दिल्यास त्यांचा फायदा नक्की होणार असून त्या करिता ग्रामीण भागातील युवकांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे,अनेक खेळ आपण खेळत असतो पण कबड्डी हा असा खेळ आहे जो शहरापासून तर ग्रामीण भागात पर्यत खेळल्या जाते, ग्रामीण भागातील युवकांनी क्रिकेट प्रमाणे कबड्डी या खेळावर जास्त जोर दिल्यास यांचा फायदा भविष्यात होणार असल्याचे यावेळी बोलताना राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांनी सांगितले,राजुरा तालुक्यातील कळमना येथे जय हनुमान क्रीडा मंडळ वतीने भव्य पुरुषांचे कबड्डी सामने आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी उद्घाटक म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे उपस्थित होते.
माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या कार्यकाळात कळमना येथे विविध विकास काम पुर्ण झाल्याबद्दल गावकरी तसेच गावचे सरपंच नंदोकिशोर वाढई यांच्या हस्ते शाल,श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार अँड संजय धोटे यांचा सत्कार करण्यात आला,तसेच अनेक विकास काम मार्गी लागल्याबद्दल गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले, यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे पुढे बोलताना म्हणाले की,मी आमदार असताना माझ्या कार्यकाळात जे कामे झाले त्याचा मला आनंद आहे पण यापुढेही या कळमना गावाकरिता आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले,कळमना गावचे सरपंच नंदोकिशोर वाढई यांनी बोलताना म्हणाले की आज पर्यत कोणत्याही आमदारांनी जो निधी उपलब्ध करून दिला नाही,सर्वात जास्त निधी कळमना गावासाठी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी दिला आहे, संजय भाऊ बोलणारे नाही तर प्रत्येक्ष काम करणारे नेते असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले व तोंडभरून कौतुक केले,याप्रसंगी मंचावर उपस्थित ईतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले
यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांचे सह गावचे सरपंच नंदोकिशोर वाढई,भाजपाचे तालुका महामंत्री दिलीप वांढरे,युवा नेते संदीप गायकवाड,पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे,तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई,माजी सरपंच सुधाकर पिंपळशेंडे,ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपलशेडे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,प्रभाकर साळवे,महादेव ताजने,सूरज गव्हाणे,सुजित कावळे,केतन जुनघरे,उत्पल गोरे,समाधान लडके तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.