आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. ५ जानेवारी २०२३) -
काँग्रेस जनसंपर्क कार्यालय, इंदिरा जिनिंग येथे राजुरा तालुका व शहर महिला काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी उपस्थित महिलांनी महिला काँग्रेसच्या संघटने विषयी आपली मते व्यक्त केली. आमदार सुभाष धोटे यांनी महिलांनी आता इतरांवर अवलंबून न राहता स्वतः समोर येऊन अधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेऊन महिलांच्या समस्या सोडवून इतर महिलांना सक्षम केले पाहिजे असे प्रतिपादन केले तर माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी महिलांना संभाषन कौशल्य अवगत करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याची आवश्यकता स्पष्ट केली. अध्यक्षीय मार्गदर्शनातून महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर म्हणाल्या की महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आता आपआपल्या स्तरावर पक्षाचे ध्येय, धोरणे, विचारधारा, कार्यक्रम आणि विविध विकासकामे घराघरापर्यंत पोहचविण्याचे काम केले पाहिजे तसेच आपण स्वतः सक्षम होऊन स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध कार्यालयांमध्ये जाऊन अधिकारी व प्रशासनाला धारेवर धरले पाहिजे असे मत व्यक्त केले. (MLA Subhash Dhote)
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा कविता उपरे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी सभापती कुंदा जेणेकर, निर्मला कुलमेथे, समाजसेविका तथा कवयित्री संगीता धोटे, पूनम गिरसावळे, शुभांगीताई खामनकर, ज्योतीताई शेंडे, निताताई बानकर, इंदूताई निकोडे, सुमित्रा कुचनकर, कल्याणी गेडाम, अर्चना गर्गेलवार, कामीना उईके, वर्षा कानकाटे, मंगला हांडे, रंजना धोटे, मनिषा देवाळकर, वर्षा वरफडे, चिल्लावार ताई यासह अनेक माजी नगरसेविका, महिला सरपंच, ग्रा. प सदस्य, वॉर्ड अध्यक्ष व इतर महिला पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (Arun Dhote)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.