Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तालुक्यात ग्रामपंचायत उपसरपंचाची उद्याला निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उपसरपंचपदी वर्णी लागण्यासाठी रस्सीखेच सुरू  आमचा विदर्भ - अविनाश रामटेके प्रतिनिधी विरूर स्टेशन (दि. १० जानेवारी २०२३) -         शासनाने थेट...
उपसरपंचपदी वर्णी लागण्यासाठी रस्सीखेच सुरू 
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके प्रतिनिधी
विरूर स्टेशन (दि. १० जानेवारी २०२३) -
        शासनाने थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंचाची निवड पद्धत लागू करून नुकेतच निवडणूक घेतली मात्र उपसरपंच पदाकरिता नवनिर्वाचित निवडून आलेल्या सदस्यातून उद्या दिनांक 11 जानेवारी ला निवडणूक अधिकारी यांनी निवडणूकीची कार्यक्रम जाहीर केल्यानें उपसरपंचाची माळ आता कोणाच्या गळ्यात पडेल यांकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे दिसून येते आहे. 

        उपसरपंच पदाची निवडणूक ही निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्य मधून होत असल्याने या नवनिर्वाचित सदस्यांना ग्रामपंचायतीच्या गावगवड्यात मोठे महत्व प्राप्त झाले आहे. अकरा सदस्य असलेल्या विरुर ग्रामपंचायतच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकित कांग्रेस गटातील स्थानिक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन पक्षात होत असलेल्या विरोधी लाटेवर मात करीत सरपंचासह आपले आठ सद्स्य निवडुन आणले तर  यावेळी भाजपाला जमेची बाजू असतांना सुद्धा आंतरिक कलहामुळे फक्त एका सदस्यांवर समाधान मानावे लागले व एकेकाळी विरुर राजकारणांत वचक असलेले शेतकरी संघटनेने आपल्या दोन सदस्य काढण्यात यशस्वी झाले परंतु नव्यानेच निवडणुकीत भाग घेत गोंडवाना पार्टी ही स्वतंत्र लढत एक महिला सदस्य निवडुन आणून आपले खाते उघडले तर दुसऱ्या क्रमांकावर सरपंच पदाचा उमेदवार राहिल्याने हा धक्का पाहता मतदार याकडे  मोठ्या कुतुहलाने बघत असल्याने दिसून येत आहे. 

        विरुर हे पेसा योजनेत येत असल्यानें सरपंच पदाकरिता अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी राखीव होते. यावेळीं यात कांग्रेस प्रणित अनिल बंडू आलम यांनी बाजी मारली तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगली कामगिरी करीत सात सदस्य निवडुन आणून आपले बहुमत सिद्ध केले. विरुर येथे अनुसूचित जातीची लोकसंख्या ही जास्त असल्याने नेहमीच यांचा बोलबाला राहिल्याचे दिसुन येते कारण ही तसेंच, मागील वीस वर्षांपासून विरुर ग्रामपंचायत वर अनुसूचित जातीचाच व पुरुष उपसरपंचच्या आसनावर विराजमान होत आहे, मात्र यावेळी बहुमत असलेल्या गटात प्रथमच खुल्या प्रवर्गातून महिला निवडून आल्याने यावेळीं उपसरपंच पदाकरिता फेरबद्दल बघायला मिळणार काय हे गावकऱ्यांत चर्चा होताना दिसून येत आहे. मात्र दि. 11 लाच हे चित्र स्पष्ट होऊन नवनिर्वाचित सदस्य हे गावातील विकासकामत हातभार लावून गावाची कायापालट करतील अशी विरुर येथील जनता अपेक्षा करीत आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top