Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भाजपा अल्पसंख्याक मोर्चा राजुरा तालुका अध्यक्ष पदी सैय्यद शहेजाद अली यांची नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मान्यवरांनी अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी राजुरा (दि. १० जानेवारी २०२३) -          भाजपा अल्पसंख...
मान्यवरांनी अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. १० जानेवारी २०२३) - 
        भाजपा अल्पसंख्याक मोर्चा चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी बैठक नुकतीच पार पडली, या बैठकीत अनेक मुद्यावर चर्चा करण्यात आली तसेच भाजपच्या वतीने अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने अनेक कार्यक्रम राबविणार असल्याचे यावेळी बैठकीत सांगितले, तसेच यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या नियुक्त्या करण्यात आली. राजुरा येथील भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते मुस्लिम समाजातील सुपरिचित चेहरा म्हणून ओळखल्या जाणारे तसेच समाज हिताचे कार्य व भाजप संघटनचे काम उत्कृष्ट पणे पार पाडणारे सैय्यद शहेजाद अली यांची चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष शेख जुम्मन रिजवी यांच्या सूचनेनुसार भाजपा अल्पसंख्याक मोर्चा राजुरा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी नवनिर्वाचित भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे तालुका अध्यक्ष सैय्यद शहेजाद अल्ली यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच पक्ष संघटन आणि मुस्लिम समाज बांधवांना एकत्र करून भाजपा पक्ष बळकटी करिता कार्य कराल आशा व्यक्त केली. (sidhir mungantiwar) (adv sanjay dhote)

        भाजपा तालुका राजुराच्या वतीने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, तालुका अध्यक्ष सुनिल उरकुडे, भाजप नेते अरुण मस्की, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय उपगनलावार, कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, महामंत्री प्रशांत घरोटे, माजी नगरसेवक राधेश्याम अडानिया, माजी नगरसेवक हरजितसिंग संधू, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, भाजयुमो तालुका महासचिव रवि बुरडकर, प्रशांत साळवे, सईद कुरेशी, मतीन कुरेशी, राजीक कुरेशी, शोहेब शेख, सय्यद ताहेर अल्ली, जाहेद बेग, वसीम शेख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top