Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा येथे पहिले विदर्भ स्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार उदघाट्न वृक्षदिंडी ने होणार सुरुवात तर मराठी सिने अभिनेते जयराज नायर यांची विशेष उपस्थिती आमचा...
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार उदघाट्न
वृक्षदिंडी ने होणार सुरुवात तर मराठी सिने अभिनेते जयराज नायर यांची विशेष उपस्थिती
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. १० जानेवारी २०२३) - 
        नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था नाद अभियान अंतर्गत पहिले विदर्भ स्तरीय पर्यावरण संमेलन राजुरा येथील ओम साई मंगल कार्यालय येथे दि.13 जानेवारी ला आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला उदघाट्क म्हणून ना. सुधीर मुनगंटीवार, मंत्री - वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, म.रा. हे उपस्थित राहणार आहेत. तर सत्कारमूर्ती म्हणून हंसराज अहिर, अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री भा.स., कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुयोग धस, आदर्श महाराष्ट्र भूषण, संस्थापक अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, विशेष अतिथी म्हणून बाळू धानोरकर, खासदार, चंद्रपूर, सुभाष धोटे, आमदार, राजुरा, विजय वडेट्टीवार, माजी मंत्री तथा आमदार, ब्रम्हपुरी, बंटी भांगडिया, आमदार, चिमूर, किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर, प्रतिभा धानोरकर, आमदार, वरोरा, माजी आमदार अँड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, अँड. संजय धोटे, सी. डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, जेष्ठ सिने अभिनेते व नेफडो संस्थेचे ब्रँड ॲम्बेसिडर जयराज नायर, राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक भवर, राष्ट्रीय सचिव सचिन वाघ,  स्वीय सहाय्यक सोमनाथ कुताळ, लेखापरीक्षक अमित सूर्यवंशी, प्रमुख अतिथी म्हणून अरुण धोटे माजी नगराध्यक्ष नप राजुरा, शरद जोगी,  उपनगराध्यक्ष नप गडचांदूर, महेंद्रसिंग चंदेल नगरसेवक नप गोंडपिपरी, नितीन भटारकर, नागपूर विभाग कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सिद्धार्थ पथाडे, जिल्हाध्यक्ष रिपाई (आ.) चंद्रपूर, सुरज ठाकरे, जिल्हाध्यक्ष, युवा स्वाभिमान पक्ष, चंद्रपूर, भूषण फुसे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर, सुनील मुसळे जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी चंद्रपूर, अविनाश जाधव, माजी जिप सदस्य तथा सचिव आ.शी.प्र.मं. राजुरा, विजयराव बावणे,  संचालक सीडीसीसी बँक चंद्रपूर, सतीश धोटे अध्यक्ष, बा.शी.प्र.मं. राजुरा, गोमती पाचभाई, अध्यक्ष, ताई फाउंडेशन चंद्रपूर आदींची पहिल्या सत्रात उपस्थिती राहणार आहे. तर दुसऱ्या सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून प्रकाश लोणकर, भा.व.से., मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त हे राहतील. तर विशेष अतिथी म्हणून रंगनाथ नाईकडे, भा.व.से. मुख्य वनसंरक्षक, नागपूर वनवृत्त, संपत खलाटे, उपविभागीय अधिकारी राजुरा, हरीश गाडे तहसीलदार राजुरा, सुरेश येलकेवाड वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा, डॉ. राजकुमार खापेकर, आंतरराष्ट्रीय समन्वयक नेफडो, लताश्री वडनेरे, राष्ट्रीय सल्लागार नेफडो आदींची उपस्थिती राहील. या संमेलानात पर्यावरण व मानवता विकासाचे कार्य करणाऱ्याना निसर्ग मित्र पुरस्कार, पर्यावरण भूषण पुरस्कार, बाल निसर्ग मित्र पुरस्कार, युवा प्रेरणा पुरस्कार, सेवाभावी संस्थाचा, पत्रकाराचा सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष, भाजपा तथा माजी जिप अध्यक्ष हे आहेत. या संमेलनात मोठयासंख्येने पर्यावरणप्रेमिनी उपस्थित राहण्याचे आवाहन बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नेफडो तथा संमेलनाचे मुख्य संयोजक यांनी केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top