शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबन भाऊ ऊरकुडे यांच्या नेतृत्वात ठाणेदारांना निवेदन
आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर प्रतिनिधी
राजुरा -
तालुक्यातील साखरी येथे अवैध दारू विक्री सऱ्हास सुरु असून याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता गावातील युवानेते अंकुश गोरे यांच्या नेतृत्वात शेकडो महिला आणि युवकांनी बैठक घेऊन गावात सुरु असलेल्या अवैध दारू विक्री संदर्भात एल्गार पुकारला आहे. (baban urkude) (sakhari) (ankush gore)
गावात दारूबंदी झालीस पाहिजे अश्या मागणीसह महिलांनी गावातील युवकांना प्रतिसाद देत दारू विक्रेत्याला रंगे हाथ पकडून त्याची संपूर्ण दारू नष्ट करण्यात आली. परंतु अवैध विक्रीला पूर्णपणे आळा बसला नाही. (shivsena)
गावात सुरु असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंब त्रस्त असून शिवसेना समन्वयक बबन उरकुडे यांच्या मार्गदर्शनात आणि युवा नेते अंकुश गोरे यांच्या नेतृत्वात गुरुवारी शेकडो महिला आणि युवकांनी राजुरा पोलिस ठाणे गाठत ठाणेदाराला निवेदन सादर केले. (polic station rajura)
सदर प्रकरणी त्वरित कार्यवाही करत गावात यापुढे दारू दिसल्यास पोलीस ठाण्यासमोर धरणा आंदोलन करु असा इशारा शिवसेना नेते बबन उरकुडे यांनी दिला आणि समोर अश्याप्रकारची साथ असल्यास गावाहितासाठी नेहमी लढत राहू अशी भूमिका अंकुश गोरे यांनी मांडली. यावेळी सचिन निमकर, घनश्याम नळे, प्रवीण मोरे, अमोल अडबाले, अक्षय करमनकर, शुभम टिपले, अंकुश अडबाले, चेतन थिपे, अमित निमकर, शुभम काटवले, प्रज्योत कुडवेकर, सुनिल नगराडे, रितेश त्रिशूलवार, अर्चना आत्रम, रुंदा बोबडे, विना काटवले, शोभा कावले आणि शेकडो युवक आणि महिला उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.