राजुरा -
पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी तुकूम या छोटयाशा गावातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत प्रा. विठ्ठल शा. आत्राम यांचा आचार्य पीएचडी पदवी प्राप्त करण्यापर्यंतचा प्रवास हा अतिशय थक्क करणारा आहे.
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. विठ्ठल शा. आत्राम हे यापूर्वी जि.प. चंद्रपूर येथे स्पर्धा परिक्षेतून निवड होवून कनिष्ठ सहा. लेखा या पदावर 7 वर्षे सेवा दिली. दरम्यानच्या काळात तीन एम.पी.एस.सी. च्या क्लॉस 1 ऑफिसरच्या परिक्षा पास केल्या व दोन वेळा मुलाखती दिल्या होत्या. परंतु त्यांची निवड होत नव्हती परंतु ते निराश झाले नाही. अधिकारी वा मोठया पदावर निवड होण्यासाठी पाय रोखून अविरत परिश्रम घेत होते. त्याच कालावधीत त्यांनी नेट, सेट या दोन्ही परिक्षा उत्तीर्ण केल्या. आदर्श शिक्षण मंडळ राजुराच्या संस्थेत त्यांची सहा. प्राध्यापक पदी निवड झाली. तेव्हापासून ते पीएचडी करीता मेहनत घेत होते. त्यांच्या पीएचडीचा विषय हा ‘‘चंद्रपूर जिल्हयातील अनुसूचित जाती-जमातींचे सामाजिक, आर्थिक विकासाचे तुलनात्मक अध्ययन’’ हा होता. हा विषय निवडण्यामागील त्यांचा हेतू हा ज्या आदिवासी समाजात आपला जन्म झाला त्याच्या मागासलेपणाची प्रमुख कारणे व त्यावरील ठोस उपाय आखणे हा होता. त्यांनी हा आपला प्रबंध थोडयाच दिवसात पुस्तकं रुपात सार्वजनिक करण्याची इच्छा बोलून दाखवलेली आहे. ते स्वतः समाजशास्त्र विषयात गोल्ड मेडल असून आपली विद्यार्थीही गोल्ड मेडल आली पाहिजेत म्हणून प्रयत्नरत असून आतापर्यंत त्यांची चार विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून मेरिट मध्ये आलेली आहेत.
आचार्य पदविकरीता त्यांचे प्रथम मार्गदर्शक म्हणून स्वं. डॉ. विनायक इरपाते माजी कुलसचिव हे होते. परंतु त्यांच्या अकस्मात निधनानंतर दुसरे मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. श्याम खंडारे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे त्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहीले. त्यांच्या या यशाबध्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षात होत आहेे.
त्यांनी आपले यशाचे श्रेय कै. वडील शामराव आत्राम, आई विमलबाई आत्राम, स्वर्गिय प्रभाकरजी मामुलकर साहेब, स्वं. डॉ. विनायक इरपाते, मार्गदर्शक डॉ. श्याम खंडारे, डॉ. राजेंद्र बारसागडे, प्रा. रष्मी मोटघरे, डॉ. राजेंद्र मुद्दमवार, डॉ. एस.एन. शेंडे, कविता मडावी, राजेंद्र कुडमेथे यांना दिले आहे.
त्यांचे अभिनंदन आशिप्रमं राजुरा चे सचिव अविनाश जाधव, प्राचार्य डॉ.एस.एम.वारकड, उपप्राचार्य डॉ. राजेश खेराणी, शिवाजी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवृंद व कर्मचारी तसेच डॉ. प्रविण येरमे, डॉ. शारदा येरमे, डॉ. मधूकर कोटनाके, दिवाकर मडावी, डॉ. प्रफुल सिडाम, देवराव नगराळे, प्रब्रम्हानंद मडावी, सुनील कुमरे तसेच समाजातील सर्व स्तरातुन त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.