आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील गोवरी या गावात महाबली हनुमान मंदिराच्या परिसरातील एका इमारतीत गेल्या विस वर्षांपासून व्यायाम शाळा सुरु असतांना गत तीन वर्षा आधी काही कारणास्तव स्थानिक मतभेदातून व्यायामशाला बंद करण्यात आली. त्यावेळी तत्कालीन जिप सभापती सुनील उरकुडे यांनी समस्त ग्रामसभेच्या समक्ष या गावाकरिता स्वतंत्र अशी प्रशस्त व्यायामशाळा इमारत तयार करण्याचे आश्वासन दिले होते. शब्द दिल्याप्रमाणे तत्कालीन आमदार अँड. संजय धोटे यांनी स्थानिक विकास निधीतून रुपये दहा लक्ष मंजूर करून दिले आणी इमारत मंजूर करून दिली. (Former ZP Chairman Sunil Urkude) (Vyayamshala Gouri)
आज 1 डिसेंबर ला तयार झालेल्या इमारतीत बोलल्या प्रमाणे सुसज्ज व्यायाम शाळेचे युवापिढीच्या साक्षीने लोकार्पण व व्यायाम शाळेचे उदघाट्न माजी जिप सभापती सुनील उरकुडे यांचे हस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शंकर बोढे, अविनाश उरकुडे, विनोद वांढरे, महेश कोडगीलवार, नागेश्वर ठेंगणे अध्यक्ष सेवा सहकारी संस्था गोवरी, मारखडी लांडे, अभय उरकुडे, समीर इटकेलवार, हर्षल वनकर, वैभव काळे, तुषार करमणकर, गणेश इटणकर, निखिल पिंपळकर, ऋतिक वासाडे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.