Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 19 डिसेंबरला राजुरा येथे भव्य शेतकरी मेळावा तसेच सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लोकनेते स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे व प्रेरणा स्थळाचे लोकार्पण आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा -         स्व...
लोकनेते स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे व प्रेरणा स्थळाचे लोकार्पण
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा -
        स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष व लोकनेते स्मृतीशेष मा. प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 19 डिसेंबर सोमवारला ठीक ११.०० वाजता राजुरा येथे भव्य शेतकरी मेळावा व सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे होत आहे. (loknete prabhakarrao mamulkar) (jayanti)

        कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष (इतर मागासवर्ग आयोग) हंसराज अहिर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते तथा माजी खासदार नरेश बाबू पुगलीया राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष एडवोकेट संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधाकरराव कुंदोजवार, श्रीमती सुमनताई प्रभाकरराव मामुलकर, ज्येष्ठ संचालक दत्तात्रय येगीनवार ,उपाध्यक्ष श्रीधरराव गोडे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष एडवोकेट अरुण धोटे, माजी सभापती अरुण निमजे, माजी तालुकाध्यक्ष राजीव चंदेल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, नगरपरिषद जिवतीचे माजी अध्यक्ष गजानन जुमनाके, ज्येष्ठ काँग्रेस नेते गजाननराव गावंडे, अबिद अली, माजी सभापती आबाजी ढुमणे यांची उपस्थिती लागणार आहे. (aadarsha shikshan prasarak mandal rajura) (avinash jadhav)

        ठीक ११.०० वाजता शेतकरी मेळाव्यात हवामान अभ्यासक पंजाबराव हे "हवामानावर आधारित शेती" यावर मार्गदर्शन करणार आहेत.तसेच याप्रसंगी लोकनेते स्मृतीशेष प्रभाकरराव मामुलकर साहेब यांच्या पुतळ्यांचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व दिवंगत संचालकाच्या स्मृतीस उजाळा देणाऱ्या प्रेरणास्थळाचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडणार आहे. सायंकाळी ठीक ५.३० वाजता भव्य कव्वाली महफिल आयोजित करण्यात आलेली आहे यात मुंबई येथील प्रसिद्ध कव्वाल जुनेद सुलतानी यांचा कव्वाली गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 20 डिसेंबर रोज मंगळवार ला सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. (shetkari melava)

        दिनांक 17 व 18 डिसेंबर रोजी विदर्भ स्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा पंचायत समिती समोरील पशुवैद्यकीय दवाखान्यात परिसरात पार पडणार आहे.

        या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव सहसचिव दौलतराव भोंगळे, कोषाध्यक्ष साजिद हुसेन बियाबानी, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एम वारकड, कोरपणा येथील प्राचार्य डॉक्टर टी.सी. जोसेफ, शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आर आर खेराणी यांनी केलेले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top