Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अल्ट्राटेक सिमेंट येथे ट्रक चालकांसाठी शिबिर आयोजित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्ट्राटेक सिमेंट लॉजीस्टीक विभाग आवाळपुर व निहाल जनसेवा केंद्र नांदा फाटा यांचे संयुक्त आयोजन आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनि...
अल्ट्राटेक सिमेंट लॉजीस्टीक विभाग आवाळपुर व निहाल जनसेवा केंद्र नांदा फाटा यांचे संयुक्त आयोजन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. १७ डिसेंबर २०२२) -
        अल्ट्राटेक वाहन चालक प्रशिक्षण कार्यालय आवाळपुर येथे अल्ट्राटेक सिमेंट लॉजीस्टीक विभाग व निहाल जनसेवा केंद्र नांदा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ट्रक पार्किंग विभागातील वाहन चालकांनसाठी  ईश्रम कार्ड, आभा कार्ड, आधार कार्ड, वाहन विमा, आरोग्य विमा, आयुष्यमान कार्ड  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांना सुधारित आधार नोंदणी, वाहन विमा,  श्रम योगी मानधन योजना, अपघात विमा व विविध योजने संदर्भात वाहन चालकांना मार्गदर्शन  करण्यात आले. (gadchandur) (Ultratech Cement Logistics Division)

        निहाल जनसेवा केंद्र नांदा फाटा चे संचालक हबिब शेख यांनी ट्रक चालक यांना आधार कार्ड, ई श्रम कार्ड, वाहनांचे बिमा, आयुष्यमान हेल्थ कार्ड काढून दिले. या उपक्रमाचा लाभ १५० वाहन चालकांनी घेतला.

       सतत कामानिमित्त कायमस्वरूपी घरापासून व आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वाहन चालकांना कागदपत्रे काढण्याकडे दुर्लक्ष होत असते. त्या शिवाय माल भरणे व उतरवणे, दिवस रात्र वाहन चालविणे, यांमुळे वाहन चालकांना वेळ मिळत नसल्याने ही बाब लक्षात घेऊन अल्ट्राटेक सिमेंट लॉजीस्टीक विभाग तर्फे वाहन चालकांसाठी हे  शिबिर घेण्यात आले.

        या शिबिरासाठी अल्ट्राटेक सिमेंट लॉजीस्टीक विभागाचे मुख्य अधिकारी चंद्रशेखर पांडे, रविकिरण पांडे, देवेंद्र शर्मा, नितीन व्यास, आनंद विशरोजवार, सोमनाथ चौधरी,मनोज राउत, मोहन देशमुख, संदिप चौधरी, अमोल गुजर, सुहास पाटील, सुधीर टोंगे, मोहम्मद एजाज, चंद्रपालजी शर्मा, संतोष रोकमवार यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top