राजुरा (दि. ११ डिसेंबर २०२२) -
पुरातन काळातून गावाची तहान भागवत असलेल्या विहिरीला मातीने विझवून त्याचा उपयोग स्वतःच्या खाजगी कामाकरिता असल्याची बाब उजेडात आली आहे. राजुरा तालुक्यातील साखरी (वा.) येथे एका इसमाने सदर विहीर बुझवूनत्याच्यावर पान टपरी सुद्धा थाटली आहे. सदर विहिरीवरील अतिक्रमण उठविण्याकरिता गावकऱ्यांनी ग्रापं ला निवेदनही दिलेत मात्र काहीही झाले नाही. ग्राम पंचायती मध्ये अतिक्रमण काढण्याकरिता ठराव हि पारित करण्यात आला मात्र पाच महिने उलटून गेले तरीही कारवाई होत नसल्याने लोकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्रापं ने अतिक्रमण विरोधात कठोर पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन उभारू असा इशारा सामजिक कार्यकर्ते अंकुश गोरे यांनी दिला आहे. (sakhari waghoba) (rajura) (gram panchayat sakhari (va.)) (social workers ankush gore)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.