Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नर्सरीतील मजुराना ब्लेंकेट चे वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा (दि. ११ डिसेंबर २०२२) -         नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे अंतर्गत कार्य...

विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा (दि. ११ डिसेंबर २०२२) -
        नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती नागपूर विभाग अध्यक्ष विलास कुंदोजवार यांच्या वाढदिवसानिमित्याने सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र राजुरा सुमठाना येथील नर्सरी मधे कामकरणारे मजुराना ब्लँकेट चे वितरण करून "एकच ध्यास मानवता विकास" ही नेफडोची संकल्पना प्रत्यक्षात राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच आपल्या सोबत काम करणारे सर्व महिला मजूर व त्यांचे सहकारी यांना स्नेहभोजन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या विभागीय अध्यक्षा अल्का दिलीप सदावर्ते यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा आणि विलास कुंदोजवर यांच्या कार्याचा व पदाचा परिचय करून दिला. नेफडो चे सुनील रामटेके आणि उज्वला जयपूरकर यांनी गीत गायन केले. अल्का सदावर्ते यानी सुध्दा वाढदिवसाचे गीत गायन केले. कुंदोजवार यांच्या मातोश्री श्रीमती लीलाबाई यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय जांभूळकर, नागपूर विभागीय अध्यक्ष यांनी मानले. (sumthana nursary)

        याप्रसंगी मंजुषा कुंदोजवार, दिलीप सदावर्ते, विजय पचारे, सुरेश गिरटकर, स्वाती गिरटकर, उज्वला जयपुरकर, सुनील रामटेके, रजनी रामटेके, किशोर कडूकर, लीलाबाई चोपावर, प्रमोद चोपावर, सरिता, संगीता चोपवार, गणेश बुरान, संजय भोयर, दीपक खणके, प्रदीप भिवनाकर, राजू बारस्कर, गोविंदा तम्मीवार, संदीप तुप्पट आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. हा कार्यक्रम निसर्गरम्य वातावरणात साजरा झाला हे विशेष. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top