राजुरा (दि. १ डिसेंबर २०२२)
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी अंतर्गत बारावा हप्ता न आल्याने शेतकऱ्यांत नाराजी दिसून येत आहे. हप्त्यासाठी शेतकऱ्यांना रोज तहसील कार्यालय गाठावे लागत आहे. संतप्त शेतकरी तहसील कार्यालयात माहिती घेण्याकरिता जात असता तहसील कायालायातून आम्ही या वरती काही करू शकत नाही हे सर्व केंद्रातून हाताळले जाते असे उत्तर देऊन शेतकऱ्यांना परत पाठवण्यात येत आहे. (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi)
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात हप्ता आला होता. मात्र दोन महिने होत असताना सुद्धा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात न आल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहे. हप्त्यासाठी शेतीचे कामे सोडून शेतकऱ्यांना तहसील कार्यालय गाठावे लागत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.