राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वापरले होते अपशब्द
कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरपना वतीने गडचांदुर इथे विर बाबुराव शेडमाके चौकात जाहीर निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोरपना तालुका अध्यक्ष शरद जोगी यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा तीव्र विरोध करत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंच्या महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांच्यासारखे नेते मंत्री पदावर राहून महिलांविषयी असम्मान जनक भाषेचा वापर करून काहीही बोलतात तरीही ते मंत्रिपदावर राहतातच कसे ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात मोठे आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. या प्रसंगी राष्टृवादी कांग्रेस चे राजुरा विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, प्रविण काकडे, सुनील अरकिलवार, करणसिंग भुराणी, प्रविण मेश्राम, मुनीर शेख, आकाश वराटे, अशोक क्षिरसागर, अनिल उज्वलकर, कल्पना गेडाम, अभिषेक तुरानकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.