विरुर गाडेगाव येथील उपसरपंच मीनाताई सुरपाम व ग्रामंचायत सदस्य बबिता कन्नुरवार यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
कोरपना तालुक्यातील विरुर गाडेगाव व अंतरगाव बु येथे ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आढावा बैठक माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठीक प्रसंगी विविध विषयांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली, याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवत माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली गाडेगाव विरुर येथील उपसरपंच मीनाताई सुरपाम व ग्रामपंचायत सदस्य बबिता कन्नूरवार यांनी भाजपात प्रवेश घेतला. यावेळी नव प्रवेशित भाजपा कार्यकर्त्यांचे दुप्पटे प्रदान करून स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला फायदा नक्की होईल असा विश्वास माजी आमदार अँड संजय धोटे यांनी व्यक्त केला.
बैठकीप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार अँड संजय धोटे म्हणाले की, कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक ही कोणत्याही प्रकारे जिकण्यासाठी लढण्याची तयारी करा. गाडेगाव येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी याचे समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून गावातील काही विकास कामासंदर्भात समस्या असल्यास त्या करिता पूर्ण सहकार्य करण्यात येणार असून, गाडेगाव विरुर व अंतरगाव बु.ग्रामपंचायत वर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, बंडू पाटील वडस्कर, विरुर गाडेगावचे मनोहर झाडे, शंकर झाडे, शाम देवतळे, सुधाकर नक्षीने, कवडू हुलके, सचिन हुलके, गणेश ताजने, हरिदास करमनकर, भगवान करमनकर, सुभाष केळझरकर, गुलाब परचाके, संजय काशीपेठे, प्रसाद कोरांगे, विलास चौधरी, विठ्ठल शेडके, अरुण कल्लूरवार, अशोक सुरपाम अंतरगाव बु येथील बंडू पाटील वडस्कर, विनोद सूर, रवि बोबडे, महादेव वडस्कर, अंकित वडस्कर, रामचंद्र बदखल, नामदेव निपुंगे, गजानन वडस्कर, सोमेश्वर इसने, साईनाथ ढुमने, किशोर बावणे आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.