Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शेतात लावलेल्या जिवंत विद्युत ताराला स्पर्श होऊन बिबी येथील शेतकऱ्याचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतमालकाला पोलिसांनी केली अटक मृतकाच्या कुटुंबाकडून १५ लाखांची मागणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी गडचांदुर -         कोरप...
शेतमालकाला पोलिसांनी केली अटक
मृतकाच्या कुटुंबाकडून १५ लाखांची मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
गडचांदुर -
        कोरपना तालुक्यातील बिबी येथील माजी सरपंच संतोषकुमार पावडे यांच्या शेतात एक शेतकरी मृत्यू सापड़ल्याने परिसरात एकच खडबड उडाली आहे. बिबी येथील बापूजी मारोती कन्नाके (४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना काल दि. १५ ला पहाटेच्या सुमारास घडली. 

        बापूजी मारोती कन्नाके (४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून स्वतःच्या शेतामध्ये पिकाला पाणी देण्याकरिता पहाटेच्या दरम्यान ते शेतात गेले होते. बिबी परिसरात सध्या वाघ व रानटी डुकरांची दहशत असून वन्य प्राण्यांकडून संरक्षणासाठी शेतकरी कंपाउंड तारात विद्युत प्रवाह वापरतात अशी माहिती मिळत आहे. या अवैध विद्युत प्रवाहामुळेच बापुजी कन्नाके या शेतकऱ्याने जीव गमावल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. 

        गडचांदुर पोलिसांनी या प्रकरणात शेतमालक संतोष पावडे, त्यांचा मुलगा स्वप्निल संतोष पावडे (३०) व सध्या शेतात काम करणाऱ्या देवेंद्र सुरेश माणूसमारे (३२) रा. बिबी या शेतमजुराला ताब्यात घेतले आहे. शेती मालक संतोष पावडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकांच्या नातेवाईकांनी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे.
श्वानपथकाद्वारे शोध 
        घटनास्थळावरून मृत शेतकऱ्याचे प्रेत दुर शेतात नेऊन टाकल्याने आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप शेत मालकावर होत आहे. त्यामुळे घटनास्थळावर श्वान पथक दाखल करण्यात आले असून श्वानपथकाद्वारे आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.
मृतकाच्या कुटुंबाकडून १५ लाखांची मागणी
        मृतकाच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी पोलिसांना प्रेत स्वाधीन करण्यास स्पष्ट नकार दिला. शेतीमालकाच्या जाणीवपूर्वक चुकीमुळे कर्त्या कुटुंबप्रमुख शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याने मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांकडून १५ लक्ष रुपयांची मदतीची मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top