Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: उघड्यावर मासविक्री - दुकानावर कारवाही करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रोगग्रस्त आणि मरणासन्न अवस्थेत असलेल्या बकऱ्यांचे मास विक्री होण्याची शक्यता मासविक्री करण्या अगोदर वैद्यकीय तपासणी करा नागरिकांचे आरोग्य धो...
रोगग्रस्त आणि मरणासन्न अवस्थेत असलेल्या बकऱ्यांचे मास विक्री होण्याची शक्यता
मासविक्री करण्या अगोदर वैद्यकीय तपासणी करा
नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
नगर परिषद हद्दी मध्ये विविध ठिकाणी उघड्यावर मटण मासविक्रीची दुकाने सुरू आहे. यात काही परवाना धारक आहे तर काही बिना परवानाच दुकाने चालवत आहे. 

या मासविक्री दुकानामध्ये मासविक्री करण्यापूर्वी नियमानुसार आवश्यक असलेल्या वैद्यकिय चाचण्या केल्या जात नाही. अनेक वेळा रोगग्रस्त आणि मरणासन्न अवस्थेत असलेले बोकङ-बकरी (नर-मादी) अल्प दरात विकत घेऊन त्यांचे मासविक्री केली जाते. पिसाट कुत्र्याने चावा घेतलेले, जखमी झालेल्या बोकड-बकरी सुद्धा कापून त्यांचे मास विक्री होण्याची भीती असते. त्यामुळे विना तपासणी चे मास ग्राहकांना विकत घ्यावे लागत आहे. तसेच येथील अनेक मासविक्री दुकानामध्ये स्वच्छता बाबत निष्क्रयता दिसून येत असून अनेक दुकानात तर चक्क दुर्गंध पसरली असते. नांदा फाटा, वनसडी येथे तर चक्क भर रस्त्यावर उघळ्यात बकरे कापत असल्याने महिला व मुलांना याचा असह्य त्रास होतो आहे. नगर परिषद, आरोग्य विभाग आणि ग्राम पंचायत प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असून यामुळे स्थानीय ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे.

अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अश्या सर्व दुकानदारास कायदेशीर सूचना देउन आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करून कार्यवाही करणे गरजेचे आहे. गडचांदुर येथील रहिवासी विजय झित्रुजी ठाकरे, हरिदास सोमाजी मुन-गौतम, शिवराम भसारकर यांनी अन्न व औषध विभाग चंद्रपूर याना विना वैद्यकीय तपासणी करता मासविक्री करणाऱ्या आणि स्वच्छता न ठेवणाऱ्या मटण मासविक्री दुकानावर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top