Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदुर-बिबी रस्त्यावर झाड कोसळले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
१० ते १२ तास उलटून ही अजूनपर्यंत झाड रस्त्यावरच सा.बां. विभाकाच्या दुर्लक्षामुळे अपघात होण्याची आशंका धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनि...
१० ते १२ तास उलटून ही अजूनपर्यंत झाड रस्त्यावरच
सा.बां. विभाकाच्या दुर्लक्षामुळे अपघात होण्याची आशंका
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदुर बिबी मार्गावर काल रात्री एक झाड कोसळून रस्त्यावर पडले आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

काल रात्रीपासून गडचांदुर नांदा फाटा मार्गावर गडचांदुर येथील विद्युत पॉवर हाऊस च्या मागे मुख्य रस्त्यावर एक झाड कोसळून अर्ध्या रस्त्यावर पडला आहे. त्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या वाहतूक ला अडथळा निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ८ ते १०तास उलटून ही अजूनपर्यंत झाड हटवले नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या लहान वाहनाला अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

या मार्गावर अशी अनेक झाडे यापूर्वीही कोसळली होती. अनेक महिने उलटूनही ते आज ही रस्त्याच्या कडेला रोडला लागून पडलेली आहे. अनेक झाडे रोडलगत वाकून उभे असून पडण्याच्या मार्गावर आहे. कोणते झाड अचानक कधी कुणावर पडेल याचा काही नेम नाही आहे. अनेक झाडांच्या लांब लचक फांद्या रोडवर येऊन अनेक गड्याना वरून आदळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकळे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेले झाड अचानक रस्त्यावर पडल्याने मोठे अपघात झाल्यास याची पूर्ण जवाबदारी सा. विभागाची बां. विभागवार राहील. आमच्या प्रतिनिधी ने सा. बां. विभागाचे कनिष्ठ अभियंता सुधेवाड साहेबाना मोबाईल वर माहिती दिल्यानंतरही ३ वा. पर्यंत ही आडवे पडलेले झाड हटवण्यात आले नव्हते. स्थानीय नागरिकांनी वाकून पडायला टेकलेल्या झाडांना अपघात होण्यापूर्वी पाडून मार्ग सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top