Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सुगंधित तंबाखूसह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा पोलिसांची धडक कारवाई आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी राजुरा -         राजुरा पोलीस स्टेशनचा कारभार हाती घेतल्यापासून प्रभारी पोलीस न...
राजुरा पोलिसांची धडक कारवाई
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
        राजुरा पोलीस स्टेशनचा कारभार हाती घेतल्यापासून प्रभारी पोलीस निरीक्षक एस.व्ही. दरेकर ह्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे, दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ व्हायची त्यातही ह्यावर्षी कमी आली असून चोरीच्या घटनेची कुठलीही नोंद ह्यावर्षी दिवाळी दरम्यान झालेली नाही. आपल्या ह्याच कार्यशैलीचा परिचय देत काल सकाळी राजुरा पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना तेलंगणातील वाकडी येथून येत असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सुमो गोल्ड वाहन क्र.MH34 AM 3024 या वाहनामध्ये शासनाने बंदी घातलले सुंगधीत तंबाखु विक्री करीता घेवून येत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सदर वाहनांची तपासणी केली असता वाहनात ईगल हुक्का तंबाखू असे लिहलेल्या २०० ग्रामचे ९२ नग पाउच प्रत्येकी 340 रू  प्रमाने एकूण किंमत 31280/- रुपये, माजा 108 हुक्का - शिशा तंबाखू असे लिहीलेले प्रत्येकी 50 ग्रॅमचे सिलबंद 398 नग डब्बे, प्रत्येकी 235 रू.प्रमाणे एकूण कि 93,530/- रुपये, मजा 108 हुक्का - शिशा तंबाखु असे लिहीलेले प्रत्येकी 200 ग्रॅमचे सिलबद 476 नग डब्बे प्रत्येकी 235 /- रू प्रमाण एकूण कि 4,45,060 /- रुपये, विमल पान मसाला असे नाव असलेले 104 सिलबंद पाउच प्रत्येकी 120 रू प्रमाणे एकूण कि. 12480/- रुपये, सिगनेचर फिटनेस पान मसाला असे नाव असलेले 75 सिलबंद पुडी प्रत्येकी 320 रू नग प्रमाणे कि. 24000/- रुपये, प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू वाहतुकी करीता वापरलेले एक पांढऱ्या रंगाची सुमो गोल्ड क्र. MH34 AM 3024 किंमत चार लाख रुपये, विवो 21 प्रो कंपनीचा मोबाईल किंमत 10 हजार रुपये, असा एकूण 10,16350/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. वाहन चालक युवराज चंद्रभान तिवारी रा कोठारी ह्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

        सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार ह्यांचे नेतृत्वात व पोलीस निरीक्षक एस.व्ही. दरेकर ह्यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राठोड, ए.एस.आय. टेकाम, हेड कॉन्स्टेबल रवींद्र नक्कावार, हेड कॉन्स्टेबल किशोर तुमराम पोलीस शिपाई महेश संदीप बुरटकर ह्यांनी सहभाग घेतला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top