Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मनसेचे जिवती तहसील व महावितरण कार्यालया समोर आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेत्तृत्वात शेतकरी आंदोलनात सहभाग  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी जिवती -         मनसे जिल्हा...
मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेत्तृत्वात शेतकरी आंदोलनात सहभाग 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
जिवती -
        मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात जिवती तहसील कार्यालयात व महावितरण कार्यालय जिवती येथे शेतकऱ्यांचा वीज बिल संदर्भात तसेच काही शेतकऱ्यांना बँक मार्फत शेतीला कर्ज न मिळाल्याच्या संदर्भात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येत मनसे कार्यकर्ते सोबतच शेतकरी सहभागी  होते. 

        जिवती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पिककर्ज मंजूर झाले नाही. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका जिवतीच्या वतीने वारंवार निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष करती असल्याचे लक्षात घेऊन शेवटी मागणीच्या पूर्ततेसाठी गुरुवार दि. 27 आक्टोंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.

        आंदोलन सुरू झाल्याचे बघून संबंधित विभागाने सदर बाबची दखल घेत आंदोलनकर्त्यां सोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेत तहसीलदार प्रविण चिडे, जिवती सीडीसी बँकेचे व्यवस्थापक राठोड, जिवती पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन जगताप, मनसे जिल्हाध्यक्ष मंदिप, शेतकर संघटना तालुकाध्यक्ष सय्यद शब्बीर जहागीरदार, मनसे तालुकाध्यक्ष हकानी शेख, सिद्धेश्वर सलगर, महिला अध्यक्ष मटपल्ली, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष नागेश खांडेकर, दत्ता गायकवाड व इतर कार्यकर्त्या समोर चर्चा  पार पडली. पिककर्ज मुदतवाढ साठी वरीष्ठांकडे पत्रव्यवहार करून मागणी करण्यात येईल आणि मुदतवाढ मिळाली तर त्वरीत अर्जदार शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करण्यात येईल' असे आश्वासन मिळाल्याने सदर धरणे आंदोलन समाप्त करण्यात आले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top