शिवशाही स्लीपर बस सेवेसाठी भाजपा पाठपुरावा करणार
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर ते पुणे साठी शिवशाही बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न करून सदर शिवशाही बस सेवा नागरिकांसाठी सुरू केली. सदर बस सेवेचा शुभारंभ करतांनी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की शिवशाही बस सेवा नागरिकांसाठी आधारस्तंभ ठरणार असून चंद्रपूर ते पुणे चा नागरिकांचा प्रवास अधिक सुखकारक होईल. तसेच शिवशाही ची स्लिपर बस सेवा नागरिकांसाठी सुरू करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पाठपुरावा करेल असे त्यांनी यावेळी. सांगितले सदर कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री ब्रिजभुषन पाझरे, सुभाष कासनगोटुवार, रवी गुरनुले, माजी उपमहापौर राहुल पावडे, माजी स्थायी समिती सभापती संदीप आवारी, अनु.जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे, रामकुमार अक्कपेल्लीवार, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, सचिन कोतपल्लीवार, रवी लोनकर, भाजयुमो महामंत्री सुनील डोंगरे, सचिव सतीश तायडे, सपना नामपल्लीवार, परिवान विभागातील स्मिता सुतवणे, विभाग नियंत्रक, पुरुषोत्तम व्यवहारे, विभागीय वाहतूक अधिकारी, रंजू घोडमारे, आगार व्यवस्थापक, राहुल मोडक, विभागीय अभियंता (स्थापत्य),पुन्नमवार आस्थापना पर्यवेक्षक, हेमंत गोवर्धन बसस्थानक प्रमुख, बोंडे, प्रभारक, अनुग्रह जोब, प्रकाश तोडकर, नागापुरे, आर . बडोले, एन. कटाईत, उंमरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.