Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अंत्योदय, प्राधान्य कुटुंब गट शिधापत्रिका धारकांना मिळणार शिधा जिन्नस किट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील २४ हजार तर कोरपना तालुक्यातील २१ हजार कार्डधारकांची दिवाळी राहणार गोड एका संचासाठी मोजावे लागणार फक्त 100 रुपये आमचा विदर...
राजुरा तालुक्यातील २४ हजार तर कोरपना तालुक्यातील २१ हजार कार्डधारकांची दिवाळी राहणार गोड
एका संचासाठी मोजावे लागणार फक्त 100 रुपये
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क 
राजुरा -
        अंत्योदय, प्राधान्य कुटुंब गट शिधापत्रिका धारकांची दिवाळी गोड करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल या चार शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिधा जिन्नस संच तालुक्यातील शासनाचा गोडाऊन मध्ये आले असून लवकरच त्यांचे वाटप रेशन दुकानदारांमार्फत करण्यात येणार आहे. शिधा जिन्नस किटचा राजुरा तालुक्यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब गटातील २४ हजार ७१० शिधापत्रिका धारकांना तर कोरपना तालुक्यातील २१ हजार ४७६ शिधापत्रिका धारकांना लाभ घेता येणार आहे. 

        अंत्योदय, प्राधान्य कुटुंब गट शिधापत्रिका धारकांनी एकाचवेळी रेशन दुकानदारांकडून एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल या वस्तू फक्त १०० रुपयात घ्याव्यात. सदर साहित्य रेशन दुकानदारांना स्पास मशीनद्वारे वाटप करणे गरजेचे असून लाभार्थ्यांनी चारही वस्तू एकाच वेळी रेशन दुकानदारांकडून घ्यावात असे आवाहन तहसीलदार हरीश गाडे, निरीक्षण अधिकारी सविता गंभीरे, पुरवठा निरीक्षक मिलिंद कांबळे, शिवाजी वाकडे तर कोरपना तालुक्यातील पुरवठा निरीक्षक निलेश रोहणकर यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाचा या निर्णयामुळे अंत्योदय, प्राधान्य कुटुंब गट शिधापत्रिका धारकांची यंदाची दिवाळी चांगली जाईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top