Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क गोंडपिपरी -         कोठारी हुन गोंडपिपरीकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वराचा...
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी -
        कोठारी हुन गोंडपिपरीकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. दिलीप एकनाथ टेकाम (23) वर्ष असे मृतकाचे नाव असून मृतक गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बंगाली कॅम्प येथील रहिवासी असल्याचे सांगितले जाते.

        मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक MH 34 BQ7458 या वाहनाने कोठारी कडून चंद्रपूर मार्गे एटापल्ली कडे जात असताना गोंडपिपरी कडून कोठारी कडे येणाऱ्या अज्ञात जड वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली, यात दिलीप टेकाम या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कोठारी जवळच्या झरण वनपरिक्षेत्र कार्यालयाजवळ घडली. या घटनेची माहिती कोठारी पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविछेदनासाठी गोंडपिपरीला पाठविला. घटनेचा पुढील तपास कोठारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण करीत आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top