Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नांदा येथील ग्राम पंचायतवर ग्राम विकास आघाडीचा कब्जा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतकरी संघटना, भाजपा, मनसे गोंडवाना पक्ष युती ने 17 पैकी 14 जागा जिंकल्या काँग्रेस पक्षाला मिळाल्या फक्त तीन जागा ग्राम विकास आघाडीचे शिल्पक...
शेतकरी संघटना, भाजपा, मनसे गोंडवाना पक्ष युती ने 17 पैकी 14 जागा जिंकल्या
काँग्रेस पक्षाला मिळाल्या फक्त तीन जागा
ग्राम विकास आघाडीचे शिल्पकार शेतकरी संघटनेचे युवा नेता रत्नाकर चटप यांच्या नेत्तृत्वात गावकऱ्यांनी दिला कौल
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
        आज जाहीर झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात नांदा ग्राम पंचायत येथून  शेतकरी संघटना, भाजपा, मनसे आणि गोंडवाना पार्टी समर्थित ग्राम विकास आघाडी ने शेतकरी कामगार युवा पॅनल चा धुवा उडवत सरपंच पदावर मेघा पेंदोर निवडून आल्या. ग्राम विकास आघाडीने एक हाती सत्ता मिळवत 17 पैकी 14 उमेदवार निवडून आले. 

        तालुक्यातील सर्वात मोठी आणि श्रीमंत समजल्या जाणारी नांदा ग्राम पंचायत येथे  सरपंच पदावर शेतकरी संघटना, भाजपा, मनसे आणि गोंडवाना पार्टी समर्थित ग्राम विकास आघाडी ची मेघा पेंदोर विजयी झाली. नांदा येथून शेतकरी संघटनेचे रत्नाकर चटप, भाजपचे पुरुषोत्तम आस्वले, मनसेचे श्री प्रकाश बोरकर यांनी मिळून आपली पूर्ण ताकतीने निवडणूक लढवली होती. प्रतिष्ठेची सीट समजल्या जाणारी नांदा ग्रामपंचायत साठी शेतकरी संघटनाचे माजी आमदार वामनराव चटप, भाजपचे माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, निलेश ताजने, सतीश उपलांचीवार यांनी विशेष प्रयत्न केले. काँग्रेस समर्थित शेतकरी कामगार युवा पॅनल ला फक्त तीन जागेवर संतोष करावे लागले. ग्राम विकास आघाडीचे शिल्पकार  शेतकरी संघटनेचे युवा नेता रत्नाकर चटप यांनी वाॅर्ड क्र. ३ येथून काट्याच्या सामन्यात सचिन बोढाले त्यांना मात दिली, तर वार्ड क्रमांक पाच येथून भाजपचे पुरुषोत्तम अस्वले यांनी अभय मुनोत यांना 40 मतांनी हरवले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top