Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: खड्डे वाचविण्याचा नादाद कार 15 फूट रस्त्याखाली उतरून नालीत गेली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर मार्गावरील त्या खड्यात "अब तक छप्पन" गेले खड्यात राजुराचे माजी नगराध्यक्ष यांचे लहान भाऊही सुद्धा पडले होते याच खड्यात सा...
गडचांदूर मार्गावरील त्या खड्यात "अब तक छप्पन" गेले खड्यात
राजुराचे माजी नगराध्यक्ष यांचे लहान भाऊही सुद्धा पडले होते याच खड्यात
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
अपघातांच्या संख्येत वाढ
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
        कधी काळी औद्योगिक क्षेत्रात जिल्ह्यात प्रथम असलेला राजुरा तालुका आता रस्त्यावर असलेल्या मोठं-मोठ्या खड्ड्यामुळे नंबर एक वर आलेला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकार, चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवून दारुड्या वाहनचालकांना या खड्यात पडून यमलोक किंवा दवाखान्यात पाठवण्याची व्यवस्था करून निघून गेली. राजुरा तालुक्यातील सर्वच रस्त्यावर मोठं मोठे खड्डे झाले असून दररोज शेकडो वाहन चालक या खड्यात पडून जखमी होत आहेत. महामार्ग असो किंवा जोड रस्ता तालुक्यातील निम्मे रस्ते खड्डेमय झालेले असतांना मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्राधिकरण यांचे या खड्यांकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. परिणामी दररोज शेकडो वाहन चालक या खड्यात पडून शेकडो लोक जखमी होत आहे.
 
         रविवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान गडचांदूर मार्गावरील सेवग प्रिंट्स समोरील रस्त्यावरील खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगाने जाणारी  कार क्रं. MH 34 - K  7387 महामार्गाच्या खाली उतरून जोड रस्त्यावरील नालीत गेली. रात्रीच्या वेळेस जेवण आटोपल्यावर पायदळ फिरणाऱ्या काही नागरिकांनी पळ काढून आपला जीव वाचविला त्यात आमराई वॉर्डात राहणारी एक तरुणीही होती सुदैवाने कोणतिही प्राणहान- वित्तहानी झाली नसली तरी कारचे आतोनात नुकसान झाले. वाहनचालक दारु पिऊन वाहन चालवत असला पाहिजे अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिली. 
        याच खड्यात दोन दिवसापूर्वी राजुराचे माजी नगराध्यक्ष यांचे लहान भाऊ हे सुद्धा पडले होते त्यांनाही जबर मर लागला असल्याने सूत्रांनी सांगितले. एकीकडे जागोजागी उघडलेली दारूची व बियर शॉपीची दुकाने यामुळे वाहन चालक नशा करून वाहन चालवीत आहेत तर दुसरी कडे सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्राधिकरण हे महामार्गावर रस्त्याच्या साइड्ची माती रस्त्यावर टाकून प्रशासनाच्या आणि नागरिकांच्या डोळ्यात धूळ झोकत आहे. संबधित विभागाने या रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top