Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आणि देवरावभाऊंनी राजुरा येथे फिरविली बॅट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजकारणात मास्टरस्ट्रोक मारणारे देवराव भाऊ क्रिकेटचा स्ट्रोक आजमावतांना क्रिकेटचा नादच खुळा आणि देवरावभाऊंनी राजुरा येथे फिरविली बॅट आमचा वि...
राजकारणात मास्टरस्ट्रोक मारणारे देवराव भाऊ क्रिकेटचा स्ट्रोक आजमावतांना
क्रिकेटचा नादच खुळा
आणि देवरावभाऊंनी राजुरा येथे फिरविली बॅट
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
        T20 विश्वचषक 2022 चा खरा थरार उद्यापासून म्हणजेच 22 ऑक्टोबरपासून पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी खेळला जाणारा हा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास आहे. भारतामध्ये एकापेक्षा एक क्रिकेटवेडे चाहते आहेत. टीम इंडियाचा सामना असल्यास हातातील काम बाजूला ठेवून क्रिकेटचा आनंद घेत असतात. आपल्या देशात असेही या खेळाचे चाहते आहे कि त्यांना जेव्हा संधी मिळाली कि ते हि बॅट फिरविण्याचा मोह आवळू शकत नाही याची प्रचिती आज राजुरा येथे पाहवयास मिळाली. भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनाही क्रिकेटचा मोह आवळता आला नाही देवराव भाऊंनी क्रिकेट सामन्यांच्या उदघाटन प्रसंगी मैदानात उतरून चक्क बॅटच फिरवली. 
      स्थानिक श्री शिवाजी हायस्कूलच्या पटांगणावर भारतीय जनता पार्टी राजूरा तथा रॉयल क्रिकेट क्लब यांचे संयुक्त विद्यमाने भव्य खुले टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते आज पार पडले. या प्रसंगीच त्यांनी प्रमुखांसह उद्घाटनीय सामन्याचा आनंदही घेतला. याठिकाणी आलेल्या खेळाडू व संघांनी सांघिक वृत्ती जोपासत आपापल्या क्रीडा कौशल्याचे उत्तम प्रदर्शन करावे. विजयासाठी सर्वांना माझ्या शुभेच्छा असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. 

        यावेळी जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, माजी जिप सभापती तथा तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, तालुका महामंत्री दिलीप वांढरे, विनोद नरेंदुलवार, विनायक देशमुख, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सचिन शेंडे, जनार्धन निकोडे, प्रदिप बोबडे, सचिन भोयर, उमेश गोरे, मयुर झाडे, निलेश भोयर आदिंसह अनेक क्रिकेटप्रेमींची उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top