राजुरा -
राजुरा शहरातील नामांकित संस्था इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल येथे शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भूमिका अभियानातून दिवाळी सणाच्या धनत्रयोदशी, लक्ष्मीपुजन, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या पाच महत्त्वाच्या सणाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच समुद्र मंथन, नरकासुर वध, लक्ष्मी पुजन, भाऊबीज अशा विविध भुमिका अभिनयातून, गीत संगीत, नृत्य, भजन, कीर्तन, पुजन आणि सेलिब्रेशन अशा रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करून मान्यवर अतिथी, पालकवर्ग, शिक्षक वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात सादर केले. एकंदरीत आज संपूर्ण इन्फंट शाळेला, शाळेतील वर्गांना अतिशय सुंदर देखावे, फलक, कोष्टक, हारतुरे यांनी सजवून विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या पाचही दिवसाचे हुबेहुब जिवंत चित्र निर्माण केले होते.
संस्थेचे अध्यक्ष तथा लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते इन्फंट कान्व्हेंट च्या या दिपोत्सव २०२२ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार धोटे यांनी विविध देखावे, भुमिका अभिनय आणि संपूर्ण दिपोत्सव कार्यक्रमाचे अवलोकन करून विद्यार्थी, शिक्षकांच्या नवोक्रमशील उपक्रमाचे कौतुक केले. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेचे संचालक अभिजित धोटे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, कल्याण नर्सिंग काँलेजचे प्राचार्य संतोष शिंदे, प्राचार्य पुजा गीते, इन्फट शाळेचे मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह पालक वर्ग, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन धरती नक्षीणे यांनी तर आभार प्रदर्शन निता जक्कनवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.