Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विजय ठाकरे यांची चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलच्या 'सहसचिवपदी' नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर -         विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे यांची नियुक्ती महा...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
        विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलच्या अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलच्या 'सहसचिवपदी' करण्यात आली.

        महाराष्ट्र राज्याचे कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने विजय ठाकरे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलच्या अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलच्या 'सहसचिवपदी' करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी औद्योगिक सेलचे अध्यक्ष डॉ. हेमंत श्याम सोनारे यांनी या नियुक्तीच्या आशयाचे पत्र विजय ठाकरे यांना देत त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या ऩियुक्ति बद्दल विजय ठाकरे यांचे कामगारांकडून अभिनंदन होत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top