Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन आदर्श हिंदी विद्यालय गडचांदूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातलबोडी शाळा अव्वल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन आदर्श हिंदी विद्यालय गडचांदूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातलबोडी शाळा अव्वल धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ...
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन
आदर्श हिंदी विद्यालय गडचांदूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातलबोडी शाळा अव्वल
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
पंचायत समिती कोरपनाचा वतीने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत उच्च प्राथमिक गटात गैरआदीवासी गटात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कातलबोडीच्या विद्यार्थीनी नंदिनी धानोरकर हिने पुंडलिक कौरासे यांचे मार्गदर्शनाने तयार केलेल्या सौर ऊर्जेवर चालणारे रोपवे या प्रतिकृतीला मिळाला. द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लखमापूर ची विद्यार्थीनी योगिता ढाकणे हिने तयार केलेल्या साधा प्रोजेक्टर या प्रतिकृती ला मिळाला, तिला कु. मोहिनी देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. तृतीय क्रमांक माउंट पब्लिक स्कुल, नांदा चा विद्यार्थी तुषार कस्तुरे याने बनविलेल्या फ्लोटिंग हाऊस या प्रतिकृती ला मिळाला त्याला कु. निमकर मॅडम चे मार्गदर्शन मिळाले. आदिवासी गटातून प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बीबीची विद्यार्थीनी गायत्री भडके हिने तयार केलेल्या हवा शुद्धीकरण यंत्र ला मिळाला तिला रविंद्र तामगाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात गैरआदीवासी गटमधून प्रथम क्रमांक आदर्श हिंदी विद्यालय, गडचांदूर ची विद्यार्थीनी नितु निषाद हिच्या गणितीय प्रतिकृती ला मिळाला. तिला अनिल भारती यांचे मार्गदर्शन लाभले. द्वितीय क्रमांक महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर चा विद्यार्थी विशाल पिंपळकर याने तयार केलेल्या होलोग्राम प्रोजेक्टर ला मिळाला त्याला सुरेखा झाडे यांचे मार्गदर्शन केले. तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हाळगाव येथील विद्यार्थी प्रणय बावणे याने तयार केलेल्या सोलर ग्रास कटर या प्रतिकृती ला मिळाला, त्याला स्वतंत्र कुमार शुक्ला यांचे मार्गदर्शन मिळाले. आदिवासी गटातून महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली चा विद्यार्थी युवराज येरगुडे याने तयार केलेल्या बहुउपयोगी हेल्मेट ला मिळाला, त्याला सलमा कुरेशी यांचे मार्गदर्शन लांबले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन पंचायत समिती कोरपना चे संवर्ग विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राचार्या यांनी केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top