Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिप प्राथमिक शाळा वडगाव ला दिली मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिप प्राथमिक शाळा वडगाव ला दिली मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट राबविला जात आहे खेळातून शिक्षण उपक्रम  धनराजसिंह शेखावत - आम...
जिप प्राथमिक शाळा वडगाव ला दिली मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट
राबविला जात आहे खेळातून शिक्षण उपक्रम 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन दिल्ली यांची वडगाव शाळेला भेट मॅजिक बस इंडिया फाउंडेशन आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शाळांमध्ये खेळातून शिक्षण हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल कोरपणा तालुक्यातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव या शाळेची निवड करण्यात आली होती. सदर शाळेला मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी 15 सप्टेंबर ला प्रत्यक्षात भेट दिली व या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांची खेळाच्या माध्यमातून विविध प्रात्यक्षिक बघितली की ज्याद्वारे खेळातून आपण जीवन कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवू शकतो आणि शिस्तबद्ध खेळ कशा पद्धतीने खेळावा आणि नियमांचे पालन कसे करावे याचे देखील प्रात्यक्षिक यांनी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये बघितली. या भेटीसाठी दिल्ली येथून झोया मॅडम आणि गीतांजली मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी मॅजिक बस फाउंडेशनचे चंद्रपूर जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे  हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोनुर्ली केंद्राचे केंद्रप्रमुख विलास देवाळकर तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सखाराम परचाके  उपस्थित होते. तसेच यावेळी त्यांनी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक यांच्याशी देखील संवाद साधला आणि खेळाच्या माध्यमातून कशा पद्धतीने शिक्षण होते हे पालकांकडून जाणून घेतले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक श्रीराम भोंगळे गुरुजी, श्रीकांत निखाडे, प्रकाश शेडमाके, सुदर्शन डवरे, मनीषा कुचनकर, मनीषा निंदेकर, ताराबाई टोंगे, सविता मडावी, वासुदेव पिंपळकर, कैलास मेश्राम, ज्ञानेश्वर ढवळे, शंकर पिंगे, श्रीकांत पाचभाई, इंदिरा खारकर, आशा मेश्राम यांनी देखील आपली मनोगत व्यक्त केली. तसेच मॅजिक बस फाउंडेशन अंतर्गत प्रशिक्षण घेतलेले काकासाहेब नागरे व नितीन जुल्मे यांनी देखील आपला अनुभव सांगितला. तसेच शाळेतील विषय शिक्षक वसंत गोरे, शिवाजी माने, सुरेश टेकाम, अनिल राठोड सर यांनी देखील आपले अनुभव सांगितले. यावेळी मॅजिक बस फाउंडेशन च्या वतीने तालुका समन्वयक निखिलेश चौधरी, शाळा सहाय्यक अधिकारी भुषण शेंडे, मुकेश भोयर, मोहिनी इंगळे, प्रतिक्षा सहारे, समुदाय समन्वयक हर्षाली खारकर आदि उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top