Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सर्वांना हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
'गजोधर भइया' ४२ दिवसांपासून होते कोमात आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स दिल्ली - प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांची मृत्यूशी झुंज...
'गजोधर भइया' ४२ दिवसांपासून होते कोमात
आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स
दिल्ली -
प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली. ते 58 वर्षांचे होते. 10 ऑगस्ट रोजी त्यांना व्यायाम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. पण ते 10 तारखेपासूनच कोमात होते आणि अखेर त्यांनी उपचारादरम्यान 42 दिवसांनी अखेरचा श्वास घेतला. विनोदाच्या दुनियेत आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या राजू यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात 5 भावंडे, पत्नी शिखा, मुलगा आयुष्मान, मुलगी अंतरा असे कुटुंब आहे.

मुळचे कानपूरचे होते राजू श्रीवास्तव
आपल्या स्टँडअप कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव हे मुळचे कानपूरचे होते. 25 डिसेंबर 1963 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. हलाखीची परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. त्यांना कलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. त्यांचे वडील रमेश चंद्रा श्रीवास्तव हे कवी होते. राजू लहानपणापासून मिमिक्री करायचे. कलेची त्यांना विशेष आवड होती. लहानपणापासूनच त्यांना एक कॉमेडियनच व्हायचे होते.

अमिताभ बच्चन यांच्या मिमिक्रीसाठी प्रसिद्ध
राजू श्रीवास्तव संपूर्ण जगभर कॉमेडी शो करायचे. त्याचप्रमाणे त्यांनी आपली ऑडिओ व्हिडिओ सीरिजही काढली होती. त्यांनी अनेक जाहिरातीतही काम केले होते. महानायक अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करण्यासाठी राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध होते. स्ट्रगलच्या काळात त्यांनी बिग बींची मिमिक्री करुन पैसे कमावले होते. टीव्ही शो, मिमिक्री, जाहीराती हे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत होते. शिवा. यूट्यूबरही त्यांचे सर्वाधिक सब्स्क्राइबर्स आहेत. युट्यूबकडूनही ते पैसे कमवत असत.

10 वर्षांत तीनदा झाली होती अँजिओप्लास्टी
राजू श्रीवास्तव यांची 10 वर्षांत तीनदा अँजिओप्लास्टी झाली होती. पहिली अँजिओप्लास्टी 10 वर्षांपूर्वी मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात झाली होती. त्यानंतर 7 वर्षांपूर्वी पुन्हा मुंबईच्याच लिलावती रुग्णालयात ते यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर 11 ऑगस्ट 2022 रोजी डॉक्टरांनी त्यांची तिसऱ्यांदा अँजिओप्लास्टी केली होती.

सामाजिक कार्यात अग्रसेर होते राजू श्रीवास्तव
राजू श्रीवास्तव सामाजिक कार्यात पुढे असायचे. त्यांनी कानपूर येथे त्यांचे दिवंगत मित्र राजेशच्या कुटुंबीयांच्या संपूर्ण खर्च उचलला होता. याशिवाय त्यांनी त्यांच्या परिसरातील रस्तेही बांधले आहेत. कानपूर येथे त्यांच्या शेजारी राहणारे रवी कुमार यांनी सांगितल्यानुसार, राजू काकांमुळे कधीही या परिसरात वाद झाले नाहीत. मदत करणे हा त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग होता. त्यांच्या मित्राचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला होता.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top