Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: संतप्त नागरिकांनी रस्त्यावर पेटविले टायर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संतप्त नागरिकांनी रस्त्यावर पेटविले टायर राजुरा - गोवारी मार्गावर धुळीमुळे नागरिकांचा आक्रोश आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क राजुरा - राजुरा-राम...
संतप्त नागरिकांनी रस्त्यावर पेटविले टायर
राजुरा - गोवारी मार्गावर धुळीमुळे नागरिकांचा आक्रोश
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
राजुरा-रामपूरगोवरी मार्गाचे काम मागील दीड वर्षांपासून कासवगतीने सुरू असून, मातीमुळे धुळीचे लोंढे उडत आहे. याच त्रासाला कंटाळून रामपूर येथील संतप्त नागरिकांनी रविवारी सकाळी अकरा वाजता माता मंदिर देवस्थानाजवळ रस्त्यावर टायर जाळून निषेध केला आहे.
राजुरा-रामपूर-गोवरी रस्ता हा नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. पावसाच्या दिवसात दररोज या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या मार्गावरून दररोज शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी, वेकोलि कामगार व तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त शेकडो नागरिकांची वर्दळ असते. मात्र कासवगतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे व संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे धुळीचे लोंढे उडत असल्याने पायदळ जाणारे विद्यार्थी, बसने प्रवास करणारे विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी वेळेवर शाळेत कार्यलयात पोहोचू शकत नाही, धुळीमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या आजूबाजूने वस्तीने असलेल्या घरात धुळीचे थर साचत असल्याने लहान बालकांपासून तर मोठ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याने नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे.
रस्ता बंद घटनेची माहिती राजुरा पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रशांत साखरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन वाहतूक सुरळीत सुरू केली. यावेळी टायर कोणी जाळले हे माहीत झाले नसले तरी पोलिसांसमोर नागरिकांनी रस्त्यांबद्दल रोष व्यक्त करीत तत्काळ रस्ता दुरुस्ती करणे, दररोज रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी केली. यानंतर वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top