Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वनविभागातर्फे नलफडी गावात वाचनालयाची निर्मिती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वनविभागातर्फे नलफडी गावात वाचनालयाची निर्मिती बामनवाडा जिल्हा परिषद शाळेला ई-लर्निंग संच भेट आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क राजुरा - मध्यचांदा ...
वनविभागातर्फे नलफडी गावात वाचनालयाची निर्मिती
बामनवाडा जिल्हा परिषद शाळेला ई-लर्निंग संच भेट
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
मध्यचांदा वन विभाग, वनपरिक्षेत्र राजुरातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत बामनवाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला ई-लर्निंग संच सुविधा दिली असून सदर शाळेमध्ये या संचाचे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांच्या हस्ते पार पडले. तसेच नलफडी येथेसुद्धा याच योजनेतून वेदिक प्लास्टरचा वापर करून जुन्या समाजभवन इमारतीमध्ये दर्जेदार वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मध्यचांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, बामनवाडा येथील सरपंच भारती पाल, उपविभागीय वनाधिकारी अमोल गरकल, सर्वानंद वाघमारे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, सरंक्षण पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक नरखेडकर, क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते, संतोष संगमवार, मुख्याध्यापिका श्रीमती झाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक नामदेव जाधव यांनी केले. यावेळी मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी विद्यार्थ्यांना संच चालू करून त्यातील चल छायाचित्र व अभ्यासक्रमाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच नलफडी येथेसुद्धा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत वनपरिक्षेत्र राजुराकडून वेदिक प्लास्टरचा वापर करून जुन्या समाजभवन इमारतीमध्ये दर्जेदार वाचनालयाची निर्मिती केली आहे. वाचनालयाचे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, सरपंच अमोल टेकाम, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, शिक्षक चापले, प्रथम एज्युकेशनच्या भारती प्रजापती, नरेंद्र देशकर, सुलभा उरकुडे व विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top