Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रस्त्याच्या मागणीसाठी नांदा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रस्त्याच्या मागणीसाठी नांदा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन  मनसे व शेतकरी संघटनेचा आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल पंधरा दिवसात खड्डे बुजवण्याच...
रस्त्याच्या मागणीसाठी नांदा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन 
मनसे व शेतकरी संघटनेचा आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल
पंधरा दिवसात खड्डे बुजवण्याचे आश्वासन
बघा व्हिडीओ
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
बिबी-नांदाफाटा-सांगोडा रस्त्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शेतकरी संघटनेच्या वतीने नांदा फाटा येथील शिवाजी चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मनसे व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तब्बल एक तास वाहतूक  रोखून धरली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक तथा जिल्हासंपर्क प्रमुख सचिन भोयर, शहराध्यक्ष मनदीप रोडे, वाहतूक सेनाप्रमुख भरत गुप्ता, शहराध्यक्ष मनसे प्रतिभा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष माया मेश्राम, जय ठाकूर यांच्या उपस्थितीत मनसेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश बोरकर, भास्कर लोहबडे, पुरुषोत्तम पुटावार यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाला शेतकरी संघटनेच्या वतीने ॲड वामनराव यांच्या मार्गदर्शनात पाठिंबा देण्यात आला. यावेळी नांदा येथील माजी उपसरपंच पुरुशोत्तम अस्वले यांनी वैयक्तिक पाठिंबा दिला. शेतकरी संघटनेचे रत्नाकर चटप, आवारपूर येथील सरपंच प्रियंका दिवे, उपसरपंच बाळकृष्ण काकडे, सांगोडा येथील माजी सरपंच सचिन बोंडे, हिरापूर येथील उपसरपंच अरुण काळे, रामदास जोगी, विठ्ठल पुरके, सुधाकर कुसराम, अजित बोधाने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मनसेचे सौरभ दास, निनाद बोरकर, रवी बंडीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाने महत्त्वाची भूमिका घेत बंदोबस्त ठेवला. आंदोलन बघता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बाजारे यांनी आंदोलन कर्त्याना येत्या 15 दिवसात रस्त्याची डागडुजी करून खड्डे बुजवण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलनाची समाप्ती करण्यात आली. यावेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील मनसे आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top